शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

२९ वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:53 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौºयाचे फलित : राज्यात त्वरेने जागा भरण्याची पहिलीच घटना

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव येथे रिक्त असलेल्या वैद्यकीय  अधिकारी पदाच्या २९ जागा भरण्यात आल्या आहेत़ मे महिन्यात अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आरोग्य विभागाकडून रिक्त पदांचे गाºहाणे मांडण्यात आले होते़ या वेळी मुख्यमंत्र्यांनीही त्वरित रिक्त जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी डॉ़ मलिनाथ कलशेट्टी यांना दिले होते़ जिल्हा प्रशासनाने यावर त्वरेने कार्यवाही करीत काहीच दिवसांमध्ये अक्कलकुवा व धडगाव येथील तब्बल २९ रिक्त जागा भरल्या आहेत़ राज्यात पहिल्यांदाच एवढ्या त्वरेने वैद्यकीय अधिकारी दर्जाच्या जागा भरण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉक़लशेट्टी यांच्याकडून सांगण्यात येत आहे़ तसेच मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे जिल्हा प्रशासनानेही ‘चांगलेच’ मनावर घेऊन पदभरतील केल्याने समाधान व्यक्त होत आहे़ तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या इतरही रिक्त जागा अशाच पध्दतीने लवकर भराव्या अशी मागणी करण्यात येत आहे़ अक्कलकुवा, धडगाव येथे तब्बल २९ वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त होत्या़ आधीच जिल्ह्यातील दुर्गम भाग असल्याने येथे आरोग्य व्यवस्था कोलमडलेली होती़ तसेच रिक्त जागांची समस्यादेखील कायम होती़ त्यामुळे सर्वच ठिकाणी आनंदी आनंद होता़ १७ मे रोजी जिल्ह्यातील मोलगी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने आरोग्य विभागाकडून रिक्त जागांची समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचण्यात आला होता़ आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथील दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यचा प्रश्न गंभीर आहे़ तसेच रिक्त जागा वर्षांनुवर्षे भरली जात नसल्याने अजून किती दिवस येथील ग्रामस्थांनी आरोग्याच्या प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे हादेखील मुद्दा होताच़ त्यामुळे यासर्वांचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी टप्प्या-टप्प्याने येथील आरोग्य विभागाच्या जागा भरण्यात येतील असे आश्वासन दिले होते़ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा ह्या राज्यशासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येत असतात़ जिल्हास्तरावरील प्रशासनाचा यात हस्तक्षेप नाही़ त्यामुळे जागा भरण्यासाठी केवळ पाठपुरावा करणे येवढेच काय ते जिल्हाप्रशासनाचे कार्य़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दखल घेत पद त्वरित भरण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलेशट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन पदसंख्येबाबत जाहिरात देण्यात आली होती़ यात खुल्या पध्दतीने ही पदे भरण्यात आली असल्याचे सांगण्यात आले़ केवळ संबंधित पात्रतेची पूर्तता करुन कागदपत्रांची पाहणी करुन ही २९ पदे भरण्यात आली आहेत़ शासकीय कामांमध्ये फार क्वचितच अशा पध्दतीने त्वरित रिक्त पदे भरण्याचे पाहिले असल्याचे संबंधित विभागाच्या सूत्रांकडून समजले़ याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेवर होणार असल्याची अपेक्षा या माध्यमातून करण्यात येत आहे़ दरम्यान, आरोग्य विभागात इतरही पदे अजून रिक्त असल्याने याबाबतही अशाच पध्दतीने तत्परतेने कार्यवाही होईल अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे़ जिल्ह्यात एकूण २९० विविध पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़ पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली़ यात, आरोग्य सेवक पुरुष ७७, आरोग्य सहाय्यक पुरुष २, आरोग्य साहाय्यिका महिला १, आरोग्य सेवक महिला १९०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११, औषध निर्माण अधिकारी ७, आरोग्य पर्यवेक्षक २ आदींचा यात समावेश आहे़ सातपुड्याच्या दुर्गभ भागासह जिल्ह्यातील इतरही भागात पाहिजे त्या प्रमाणात आरोग्यसेवा पोहचली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरते़ अजूनही प्राथमिक आरोग्य सेवांसाठीदेखील रुग्णांना कोसो दूर जावे लागत आहे़ त्यामुळे प्रशासकीस पातळीवर याची दखल घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे सुकर व्हावे यासाठी प्रयत्न करणे अपेक्षीत आहेत़ मुख्यमंत्री मोलगी दौºयावर असताना त्यांच्या समोर आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या समस्या मांडल्या होत्या़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना त्वरित जागा भरण्याचे अधिकार दिले होते़     -डॉ़ आऱबी़ पवार    जिल्हा आरोग्य अधिकारीएका महिन्यात ४०० जागा भरणार - जिल्हाधिकारी४येत्या एक महिन्यात आरोग्य विभागाच्या ४०० जागा भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ मलिनाथ कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलगी ता़ अक्कलकुवा दौºयावर असताना जिल्हाधिकारी यांना संबंधित जागा भरण्याचे अधिकार दिले होते़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल व त्यावर जिल्हा प्रशासनाकडून झालेली त्वरित कार्यवाही यामुळे हे शक्य झाल्याचे डॉ़ कशलेट्टी यांनी सांगितले़ त्यानुसार एकाच दिवशी संबंधित उमेदवारांना बोलावून कागदपत्रांची तपासणी करुन तब्बल २९ जागा भरण्याची ही पहिलीच घटना असल्याचेही डॉ़ कलशेट्टी यांनी सांगितले़