शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पपईला हवामानावर आधारीत विमा लागु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 22:02 IST

कृषीभूषण प्रकाश पाटील : केळी पिकासाठीही दोन स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणी

धुळे : पपई या फळपिकाचा हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेत समावेश करावा़ तसेच डाळींब, संत्रा, मोसंबी या पिकांप्रमाणे केळी पिकाला देखील मृग व आंबिया बहारासाठी दोन स्वतंत्र योजना सुरू कराव्यात, अशी मागणी कृषीभूषण अ‍ॅड़ प्रकाश भुता पाटील यांनी केली आहे़यासंदर्भात त्यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह कृषी विभागाचे सचिव, आयुक्त आणि फलोत्पादन आयुक्तालयाच्या संचालकांना निवेदन दिले आहे़निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पपई पिकाला पोषक वातावरण आहे़ त्यामुळे १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रवार पपईची लागवड झाली आहे़ पपई लागवडीचे प्रमाण वाढत आहे़ पपई फळ पिकाचा हवामानावर आधारीत पिक विमा योजनेत समावेश करावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ सन २०१५ मध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पुढील हंगामापासुन योजना लागू करण्याची घोषणा केली होती़ परंतु ही घोषणा हवेतच विरली़ राज्यात केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड असलेल्या स्ट्रॉबेरीचा योजनेत समावेश झाला़ परंतु अजुनपर्यंत पपई उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही़ त्यामुळे पुढील वर्षापासून पपईचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी निवेदनात केली आहे़तसेच महाराष्ट्रात केळीचे उत्पादन तीन बहारात घेतले जाते़ परंतु केळी पिकाचा केवळ आंबिया बहारासाठी योजनेत समावेश असल्याने विमा संरक्षण एकाच बहाराचे मिळते़ केळी उत्पादक शेतकरी आंबिया बहाराचा विमा भरतात़ परंतु प्रत्येक बहारात हवामान आणि धोके वेगवेगळे आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई मिळत नाही़ त्यामुळे संत्री, मोसंबी, डाळींब पिंकांप्रमाणेच केळी पिकाला देखील मृग बहार आणि आंबिया बहार अशा दोन स्वतंत्र योजना लागु करुन विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी कृषीभूण प्रकाश पाटील यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे