शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील आणखी एका डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:46 IST

नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार

धुळे/सोनगीर : तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पेश प्रकाश वाघ (वय ४० वर्ष) यांचा कोरोनाने बुधवारी नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोन दिवसात धुळ्यातील दोन डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यूडॉ.कल्पेश वाघ यांना तीन दिवसापूर्वी लिव्हरच्या आजारासाठी धुळयातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू सोमवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने नाशिक येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती जास्त खराब झाली व त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.डॉ.कल्पेश प्रकाश वाघ हे मुळचे धुळयातील जुने धुळे परिसरातील राहणार होते. त्यांचे शिक्षण नांदेड येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. नंतर त्यांनी नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण देखील घेतले.दोन वर्ष प्रभारी अधीक्षक डॉ.कल्पेश वाघ दोन वर्ष सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्रभारी अधीक्षक होते. दोन महिन्यापूर्वीच या पदावर अन्य डॉक्टरांची नियुक्ती झाल्यानंतर ते त्याचठिकाणी आपल्या वैद्यकीय अधिकारी या पूर्वपदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. डॉ.कल्पेश यांच्या पार्थिवावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. धुळ्यात दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू- मंगळवारी धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्यावर बुधवारी सकाळी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सोनगीरचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पेश वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले.

टॅग्स :Dhuleधुळे