शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आहार वाटपात हलगर्जीपणा भोवला

By admin | Updated: October 21, 2016 20:12 IST

गर्भवती आणि स्तनदा मातांना शासनाच्या अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो़ पण, अचानक झालेल्या तपासणीतून हा आहार संबंधित महिलांपर्यंत पोहचलेला नाही़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २१ : गर्भवती आणि स्तनदा मातांना शासनाच्या अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो़ पण, अचानक झालेल्या तपासणीतून हा आहार संबंधित महिलांपर्यंत पोहचलेला नाही़ यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या २० सेविका आणि ५ पर्यवेक्षिका यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिली़

योजनेत १७३ गावेभारतरत्न डॉ़ए़पी़जे़ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना एक वेळेचा संपूर्ण आहार पुरविण्यात येत आहे़ या योजनेत जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील १०२ आणि शिरपूर तालुक्यातील ७१ अशा १७३ गावांतील महिलांना त्याचा लाभ दिला जात आहे़

अनुसूचित क्षेत्राचा समावेशही योजना केवळ साक्री आणि शिरपूर तालुक्यात अर्थात पेसा क्षेत्रात सुरू आहे़ अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (कॅलरिज) आणि प्रथिनांच्या (प्रोटिन्स) कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येणाचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३़१ टक्के एवढे आहे़ आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येत असल्याचे संशोधन आणि अभ्यासावरून दिसून आले आहे़ बालक जन्माला आल्यानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे़ अपुरा आहार आणि गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक जागरुकता दिसून येत नाही़

आहारापासून लाभार्थी वंचितयोजनेतील लाभार्थींना एक वेळेचे जेवण देण्याची तरतूद असून विशेष म्हणजे लाभार्थींच्या घरी जाऊन देण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ तडवी यांनी गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी गृह भेटी देण्यास सुरुवात केली. त्यात चर्चेअंती संबंधित महिलांना आहार देण्यात आला नसल्याचे लक्षात आले आहे़ ही शासनाची फसवणूक असल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.