शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
2
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
3
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
4
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
5
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
6
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
7
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
8
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
9
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
10
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
11
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
12
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
13
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
14
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
15
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
16
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
17
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुदलाचा पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:21 IST

अनेक अड्डे उध्वस्त : १२ मिराज विमानातून बॉम्बचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारतीय वायुदलाच्या टीमने पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करत बॉम्बचा वर्षाव केला़ १२ मिराज विमानातून १ हजार किलो बॉम्ब फेकल्याने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त झाले आहेत़ ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली़ यात सुमारे ३०० दहशतवादी ठार झाले़ संरक्षण राज्यमंत्री ना़ डॉ़ सुभाष भामरे यांचा या घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग राहिला़ पाकिस्तान विरोधात मंगळवारी ‘एअर स्ट्राईक’ मोठी कारवाई केली़ भारतीय वायुसेनेच्या मिराज २ हजार या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद सह दहशतवादी संघटनांच्या तळावर १ हजार किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव केला़ एकाच तडाख्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करीत पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० भारतीय जवानांच्या बलिदानाचा एकप्रकारे बदला घेतला़ या सर्व कारवाईच्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा सक्रीय सहभाग राहिला़ रविवारी रात्रीच डॉ़ सुभाष भामरे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते़ सोमवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठका, चर्चांमध्ये डॉ़भामरे हे व्यस्त होते़ डॉ़ सुभाष भामरे यांनी पुलवामा हल्याचा बदला भारतीय सैन्य दल घेईल, पाकिस्तानला चोख आणि कठोर असे प्रतिउत्तर आम्ही देवू असे बोलून दाखविले होते़ त्यांचे शब्द मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईवरुन खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत़ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करुन आमच्या शहिद जवानांच्या रक्तांचा बदला घेण्यात आला. भारतीय वायू दलाचा मला अभिमान आहे. पाकिस्तानला मोठी अद्दल आपल्या वीर जवानांनी घडवली आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आले़ यासर्व कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे