धुळे - जिल्ह्यातील तब्बल ९८२ मतदारांचे वय शंभर पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम मतदार यादी प्रशासनाने जाहीर केली आहे त्यात हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात १६ लाख ९४ हजार ८१० एकूण मतदार आहेत. ८ लाख ७३ हजार ७४८ पुरुष व ८ लाख २१ हजार ३९ महिला मतदारांचा त्यात समावेश आहे. महिला मतदारांपेक्षा पुरुष मतदारांची अधिक आहे.धुळे शहरात सर्वाधिक वृद्ध मतदार -धुळे शहरात वयोवृद्ध मतदारांची संख्या अधिक आहे. शंभर पेक्षा जास्त वयाचे २७७ मतदार धुळे शहरात आहेत. धुळे तालुक्यात शंभर पेक्षा अधिक वयाचे १६८ मतदार आहेत. साक्री तालुक्यात २३८, शिंदखेडा १३५ व शिरपूर तालुक्यातील १६४ मतदारांचे वय १०० पेक्षा जास्त आहे.जिल्हा प्रशासनाने नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यातील नव मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात २६ हजार ३०२ नव मतदार आहेत. धुळे तालुक्यात सर्वात जास्त ५ हजार ८८३ नाव मतदारांची नोंदणी झाली आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा मतदारांची भूमिका महत्वाची राहिली आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत युवकांनी उमेदवारी केली होती. बहुतांश युवकांनी प्रस्थापित उमेदवारांना पराभवाची धूळ चरत विजयश्री खेचून आणली आहे. मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक जनजागृती केली होती. प्रशासनाच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.२६ हजार नवमतदार -* जिल्ह्यातील २६ हजार नवमतदारांचे नाव मतदान यादीत समाविष्ट झाले आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ८८३ नवमतदार आहेत. त्यानंतर शिरपूर तालुक्यात ५ हजार ६२५ नवमतदार आहेत.* साक्री तालुक्यात सर्वात कमी नवमतदारांची नोंदणी झाली आहे. संकरित ४ हजार ४४१ नवमतदार आहेत. युवा मतदारांचा निवडणुकीत सहभाग वाढला आहे. त्यासोबतच त्यांच्या मतदानाचा टक्का देखील वाढला आहे.तालुकानिहाय शंभरीपार मतदार -धुळे शहर - २७७धुळे - तालुका - १६८साक्री - २३८शिंदखेडा - १३५शिरपूर - १६४जिल्ह्यातील मतदार - १६९४८१०पुरुष मतदार - ८७३७४८महिला मतदार - ८२१०३९
जिल्ह्यातील ९८२ मतदारांचे वय शंभर पेक्षा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 19:40 IST