शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:10 IST

सरपंच व ग्रामस्थांचा आरोप : गावासाठी चार टँकरची मागणी करुनही दुर्लक्ष,भीषण पाणीटंचाई, १२ दिवसानंतर होतो पुरवठा

ठळक मुद्देचिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदारदुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर

रविंद्र बोरसेविंचूर : तालुक्यातील मोरदड तांडा येथील ऊसतोड मजुराची १३ वर्षीय चिमुकली नंदिनीचा  पाय घसरून विहरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर   तब्बल २४ तासानंतर दुसºया दिवशी झाला घटनेचा पंचनामा शासनातर्फे करण्यात आला. गावात भीषण पाणीटंचाई असून १२ दिवसानंतर नळांना पाणी येते. गावातील पाणीटंचाई पाहता चार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात टाकून पाणी आणावे लागते. चिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केल्या.घटनेच्या दुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा पसरली होती. घरी सांत्वन करणाºयांची गर्दी होती. ऊसतोड मजुराची मुलगी - नंदिनी ही ऊसतोड मजूर नथ्थू पवार यांची मुलगी आहे. नथ्थू पवार हे मुलींचे शिक्षण गावात पूर्ण व्हावे यासाठी नंदिनीसह आपल्या चार मुली व एक मुलाला मोरदड तांडा येथे आपल्या आई वडिलांकडे सोडून ऊसतोड साठी वर्षभर बाहेर जात होते. ते यंदाही १५ दिवसापूर्वीच ऊसतोडीचे काम पूर्ण करुन गावात आले होते. गावात पाणीटंचाई असल्याने नंदिनीही दुपारी पाणी भरण्यासाठी   रेल्वे रुळ ओलांडून गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या४५ फूट खोल खाजगी विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली.   विहीरीत ८ ते १० फूट पाणी होते. विहीर मातीची असल्याने खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली. डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध अवस्थेत पाण्यात बुडाली. दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास नंदिनी परत का आली नाही म्हणून  शोध घेण्यासाठी विहीरीवर गेले असता नंदिनी  पाण्यात बुडल्याचे दिसले. तिला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी तिला मृत घोषीत करण्यात आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. दोन टँकर सुरु - गावासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिवसातून पाण्याचे दोन टँकर येतात. पण ते पुरेसे नसल्याने ग्रामपंचायतीने आधीच चार टँकरची मागणी केली आहे. तसेच गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ३७ लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण या योजनेस काही शेतकºयांनी विरोध केल्याची माहिती सरपंचांनी दिली.जंगलातून आणतात पाणी - गावात पाणीटंचाई असल्याने जंगलात  व    नाल्यावरुन ग्रामस्थ पाणी आणतात.

संबधित अधिकाºयावर कारवाईची मागणीमोरदड तांडा येथील नंदिनी पवार (वय १३) या चिमुकलीचा गुरूवारी दुपारी विहीरीवर पाणी भरतांना पाय घसरल्याने विहरीत पडून मृत्यू झाला़ दुष्काळ निवारणासाठी  शासनाकडून कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ मात्र प्रशासकीय अधिकाºयांच्या चुकीच्या निर्णयामुळे  नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मोरदड तांडा गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर केले़  अधिकाºयांचा हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला आहे़  शासनाकडून मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत व तिच्या मृत्यूस जबादार  अधिकाºयांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केली़निवेदनावर मनोहर पवार, ज्ञानेश्वर पवार, देवेद्र पाटील, हेमराज गवळी, नवल पवार यांनी दिले आहे.

पुरेसा पाणी नसल्याने प्रशासनाकडे चार टॅकरव्दारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती़ मात्र २ टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला़ पेयजल योजनेसाठी मंजूरी मिळाली होती़ मात्र गावकºयांनी विरोध केल्याने काम होऊ शकले नाही़          -कनीराम पवार सरपंच, मोरदड तांडागुरूवारी पत्तीसह कामाला गेली होती़ गावात पाणीटंचाई असल्याने विहीतुन पाणी भरावे लागते़ पिण्यासाठी पाणी नसल्याने मुलगी पाणी भरण्यासाठी गेली आणि तिचा पाणीटंचाईमुळे बळी गेला़ यापुढे तरी प्रशासनाने प्रयत्न करावे  -ललिता पवार  नंदिनीची आई 

गेल्यावर्षी देखील पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली होती़ पाण्यासाठी अनेक दुर्दवी घटना गावात वारंवार होतात़ मात्र प्रशासनाकडून पाण्यासाठी ठोस भुमिका घेतली जात नाही़ -दिनेश जाधव ,नागरिक 

 

टॅग्स :Dhuleधुळे