शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मारहाणप्रकरणी आरोपींना अटक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:28 IST

साक्री : गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

साक्री : तालुक्यातील म्हसदी येथील वंदना देवरे यांना मारहाण करणाऱ्या व या घटनेमध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.म्हसदी येथील रहिवाशी व नोकरीनिमित्त ठाणे येथे स्थायिक झालेल्या वंदना देवरे आपल्या नातेवाईकांच्या विवाहानिमित्त म्हसदी येथे आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना गावातील आदिवासी महिला व पुरुषांनी बेदम मारहाण केली होती व मारहाण करत ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन गेले होते. या घटनेमागे गावातील काही प्रतिष्ठित लोकांचा हात असल्याचा आरोप सदर महिला व त्यांच्या पतीने केला होता व त्यांच्या विरोधात साक्री पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फक्त दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर इतर फरार झाले आहे. यामध्ये म्हसदी येथील शाळेतील शिक्षकांचा समावेश असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. परंतु आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असून फरार आरोपींना लवकरच जेरबंद करावे, अशी मागणी वंदना देवरे, सायली देवरे व इतर महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.शिंदे यांनी पोलिसांना सूचना देऊन या घटनेत जेवढे आरोपी सामील आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरण पाहून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे