शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मिनीडोअर चालकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:40 IST

अजंगजवळील घटना : तालुका पोलिसात नोंद

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ घडली घटनामयत गणेश चौधरी हा मिनीडोअर चालक होता या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मिनीडोअर चालकाचा मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली़ अपघाताची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली़ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली़ गणेश दशरथ चौधरी (४८) रा़ मच्छिबाजार चौक, पालाबाजार धुळे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ रविवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास गणेश चौधरी याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या अपघातात गणेश यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना गणेश चौधरी यांची प्राणज्योत मालवली़ याप्रकरणी विजय रामचंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़