शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दोंदवाड शिवारात अपघात, तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:32 IST

घातपाताचा संशय : पालकांचा आरोप

विंचूर : तालुक्यातील दोंदवाड शिवारात दुचाकीचा अपघात झाल्याने बाळा उर्फ यशोदिप संजय बोरसे (२१) याचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़धुळे तालुक्यातील शिरुड चौफुली ते बोरकुंड रस्त्याने पुढे दोंदवाड शिवारातील आशाबाई प्रताप देसले यांच्या शेताला लागून अपघाताची ही घटना घडली़ एमएच १८ एआर २००० क्रमांकाच्या दुचाकीने बाळा बोरसे हा रस्त्याने जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली़ या अपघातात बाळा फेकला गेला़ त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस जबर दुखापत झाली़ गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ सुरत येथे वास्तव्यास असलेले संजय जगन्नाथ बोरसे यांचा बाळा हा मुलगा होता़ याप्रकरणी मयत बाळाचे काका अरुण जगन्नाथ बोरसे (६०, रा़ विंचूर ता़ धुळे) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली़ त्यानुसार अज्ञात वाहनचालका विरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ प्रमाणे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे घटनेचा तपास करीत आहेत़दरम्यान, ऐन पोळा सणाच्या दिवशीच अपघाताची ही दुर्देवी घटना घडल्याने विंचूर गाव व परिसरात शोककळा पसरली़ बाळा याचा अपघात नसून घातपात असल्याचा पालकांचा आरोप आहे़ त्यामुळे बाळा याची कोणाशी दुश्मनी होती का, या दृष्टीने पोलीस तपास सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे