फेक कंपनीकडून काॅल येऊन नागरिकांना आमिश दाखविले जाते. त्यातून ओटीपी दिल्यावर बँकेतून पैसे गायब होतात. ही संख्या कमी वाटत असलीतरी धुळ्यासारख्या छोट्या जिल्ह्यात ही संख्या तशी मोठीच आहे. सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत पैसे परस्पर वर्ग केल्याच्या घटनांनी यावर्षी कहरच केला आहे. तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात परस्पर पैसे देखील वर्ग झाल्याचे समोर आले आहे. घटना घडू नये म्हणून खबरदार घेणे गरजचे आहे.
बनावट बँक खात्यात पैसे वर्ग
ठगांनी बनावट कागदपत्रांद्वारे दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये कंपनीच्या नावे बँक खाती उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशीही होते फसवणूक
फेसबुकवरून विविध जाहिरातींच्या आडून ठग नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात. तर दुसरीकडे बनावट प्रोफाइलवरून आधी ओळख करून घ्यायची. पुढे ओळखीतून प्रेमात रूपांतर होताच संबंधित व्यक्तीची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करायची, अशा घटनाही वाढत आहेत. पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होते.
सध्या साेशल मीडियाचा वापर वाढत आहे. त्यातून आपली फसवणूकदेखील होऊ शकते, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोणाशीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना दक्ष राहण्याची गरज आहे.
- चिन्मय पंडित
पोलीस अधीक्षक, धुळे