शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

पाणीटंचाईमुळे ८ वीटभट्टी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:19 IST

कापडणे परिसर : मजुरीत वाढ, मजुरांची टंचाई, कोळसा महागला, संकटांची मालिका

कापडणे : कापडणेसह परिसरात ८ ते १० वीटभट्टी व्यवसाय सुरू होते. मात्र, पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट असल्यामुळे वीटभट्टी व्यवसायाला घरघर लागली आहे. यामुळे तब्बल ८ वीटभट्टी बंद पडल्या आहेत. पाणीटंचाईसोबतच वाढती मजुरी, मजूर टंचाई, कोळसा महागला, मातीची टंचाई अशा संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.कापडणे परिसराचा गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विटा तयार करण्यामध्ये नावलौकिक होता. मात्र, प्रत्येकवर्षी एक-दोन करीत वीट भट्टी धारकांचे विटा थापण्याचे व तयार करण्याचे पदावे कायमस्वरूपी बंद पडत आहेत. सध्या येथे इंदिरानगरमधील रहिवासी हेमंत जयवंत चौधरी, पंडित दगा माळी, शालिक महादू मालचे असे तीनच विटांचे पदावे सुरू आहेत. पैकी हेमंत चौधरी यांचाही वीट पदावा बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर पूर्वीपासून विटा तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करणारे गोविंद नारायण मगर, गोविंद महाराज, मनोहर सुखदेव माळी, दत्तात्रय सुखदेव माळी, मंडाबाई शिवराम माळी, बारकू दामू पाटील, राजू पाटील, अण्णा जगदाळे, रामभाऊ सुकलाल चौधरी, मुरलीधर बडगुजर, दगडू रुस्तम पिंजारी आदी वीट भट्टी धारकांचे व्यवसाय कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत.मजूर टंचाई- मातीपासून विटा तयार करण्यासाठी या अवजड व श्रमाच्या कामासाठी सहजासहजी मजूर मिळत नाही, मिळाले तर त्यांना अधिक मजुरी द्यावी लागते व ४० हजार रुपये उचलही द्यावी लागत असते. कायमस्वरूपी विटा तयार करणाऱ्या कारागिरांना ऊसतोडणीचे वेध लागतात. कारण तेथे त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये अधिक उचल मिळत असते म्हणून विटा तयार करणारे कारागीर ऊस तोडणीसाठी जात आहेत. परिणामी विटा तयार करणाºया कारागिरांअभावी वीटभट्टी व्यवसाय ओस पडत चालला आहे.माती टंचाई- पूर्वी सोनवद धरणातून भरपूर माती मिळायची, त्या तुलनेने आता विना चुनखडीची, लाल- तांबडी, चिकट, भस्सर मुरूमची व नदीचा गाळ असलेली माती उपलब्ध होत नाही. धरणातून माती उचलण्यासाठी पूर्वी पंधराशे रुपयाची रॉयल्टी देऊन सलग रात्रंदिवस तीन दिवस ट्रॅक्टरने माती वाहतूक करता येत होती. मात्र, आता तसे राहिलेले नाही. विटा तयार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण माती आता उपलब्ध होत नाही.महागडा कोळसा- डोंगरगाव धरणातील जड मातीपासून तयार करण्यात येणाºया कच्च्या विटांना लाकडांपासून भाजण्यासाठी अडचण येते, त्यामुळे ९ हजार रुपये टन दराच्या महागड्या कोळशापासून विटा भाजाव्या लागतात. तर कापडणे व्यतिरिक्त अन्य गावात मातीपासून विटा बनवल्या जातात. मात्र, त्या विटा लाकूड, शेणाच्या गोवºया, कपाशीच्या काड्या आदीपासून भाजल्या जातात. म्हणून बाहेरगावच्या १०० विटा कापडणे येथे वाहतुकीसह चारशे रुपये इतक्या कमी भावात विकल्या जात आहेत. त्या तुलनेने कापडणे येथील विटा या भावात विक्री करण्यास परवडत नाही, असे कापडणे येथील वीट तयार करणाºया व्यवसायिकांचे म्हणणे आहे.पाणीटंचाई- सततच्या दुष्काळामुळे कमालीची पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीला पाणी नाही, माणसांसह गुरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विटा तयार करण्यासाठी पाणी कसे मिळणार, हा प्रश्नच आहे. पाण्याअभावी विटा तयार करण्याचे काम रखडले आहे.बेमोसमी पाऊस- वादळ वाºयासह अवकाळी पावसामुळे मातीपासून तयार करण्यात आलेल्या कच्च्या विटांचे पूर्णत: नुकसान होते. कच्चा माल भट्टीत रचलेला असताना अवकाळी पावसामुळे पाण्यात विरघळून संपूर्ण खराब होत असतो.वाढती मजुरी- एक हजार वीट बनविण्यासाठी मजुराला सहाशे रुपये द्यावे लागतात, एक हजार कच्च्या विटा भाजण्यासाठी भट्टीपर्यंत वाहून नेण्यासाठी दोनशे रुपये मजुरी लागते, एक वीट भट्टी रचण्यासाठी दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागते, सर्व खर्च लक्षात घेता प्रत्येक तयार वीट चार रुपये नगाप्रमाणे विक्री करणे वीटभट्टी धारकांना परवडत नसल्याने दरवर्षी वीटभट्टी व्यवसाय बंद पडत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे