नंदुरबार : डॉक्टरकडे झालेल्या घरफोडीत चोरटय़ांनी 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 4 जानेवारी रोजी पहाटे अक्कलकुवा येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, अक्कलकुवा येथील इंदिरानगर भागात राहणारे डॉ.सलीमखान युसूफखान पठाण हे बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी 4 जानेवारी रोजी पहाटे खिडकीचे गज वाकवून त्यातून हात घालून दरवाजाची कडी उघडली. घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरटय़ांनी चोरून नेले. त्यात 30 हजार रुपये रोख, 15 हजार रुपयांच्या सोन्याच्या कानातील रिंग, 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, नऊ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.सकाळी ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत डॉ.सलीमखान युसूफखान पठाण यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरकडे झालेल्या घरफोडीत 74 हजारांचा ऐवज लंपास
By admin | Updated: January 5, 2017 23:03 IST