शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात 70 कोटी अनुदान प्राप्त!

By admin | Updated: January 12, 2016 01:00 IST

धुळे जिल्ह्यातील 617 गावांमधील नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी शासनाने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 70 कोटी 74 लाखांचा निधी दिला आह़े

धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात अपु:या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल़े जिल्ह्यातील 617 गावांमधील नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी शासनाने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 70 कोटी 74 लाखांचा निधी दिला आह़े त्यामुळे शेतक:यांना काहीसा आधार मिळणार आह़े प्रशासनाकडून निधी वाटपाचे नियोजन करण्यात येत आह़े

कापसासह बागायती क्षेत्र आणि फळपिकांचे नुकसान वगळून हा लाभ मिळाला आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याला कमी निधी मिळाला असल्याचे दिसून येत आह़े

जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान 530 मि़मी. आह़े यंदा सरासरीच्या 93 टक्के 495 मि़मी. पाऊस झाला़ मात्र तो अनियमित स्वरूपाचा होता़ यंदा मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाला सुरुवात झाली होती़ त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर महिना उलटूनही चांगला पाऊस झाला नाही़ ऑगस्टमध्ये मध्यंतरी काही दिवस जोरदार पाऊस झाला़ पुन्हा पावसाने दडी दिली़ त्यानंतर थेट सप्टेंबर महिन्याअखेर जोरदार पाऊस झाला़़ या अनियमित स्वरूपाच्या पावसामुळे खरीप हंगाम बहरलाच नाही़ पिकांचे अतोनात नुकसान झाल़े त्यामुळे शेतक:यांवर आर्थिक संकट कोसळल़े जिल्ह्यात नजर पैसेवारीत 676 गावांपैकी 614 गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली होती़ त्यानंतर ऑक्टोबरअखेर सुधारित पैसेवारी जाहीर झाली़ त्यात शिरपूर तालुक्यातील बाळदे, चांदपुरी व सावेर या तीन गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याने या तीन गावांचा त्यात समावेश करण्यात आला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 617 झाली होती़ 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली़ त्यातही या 617 गावांचा समावेश आह़े या 617 गावांमध्ये धुळे तालुक्यातील सर्व 168, शिंदखेडा तालुक्यातील सर्व 143, साक्री तालुक्यातील सर्व 227 व शिरपूर तालुक्यातील 76 गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता़ त्यानंतर शासनाने राज्यात कोरडवाहू नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी मदत जाहीर केली़ त्यात धुळे जिल्ह्यासाठी 70 कोटी 74 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आह़े