शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

२०१५ पासूनचा जप्त केलेला ५६७ किलो अंमली पदार्थ ‘मातीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:34 IST

धुळे जिल्हा पोलीस : १८ लाख ५७ हजाराचा होता मुद्देमाल

धुळे : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ९ पोलीस ठाण्यात १६ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ५६७ किलो ९८६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि अफू सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. हा मुद्देमाल १८ लाख ५७ हजार १३६ रुपये किंमतीचा होता. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत हा अंमली पदार्थांचा मुद्देमाल मातीत मोठा खड्डा करुन त्यात नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. २०२० मध्ये धुळे जिल्हा पोलिसांनी ३५ गुन्ह्यांत ७ हजार ९३८ किलो वजनाचा ३ कोटी ८० लाख १३ हजार १३० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. तर, २०१५ मध्ये जिल्हा पोलिसांनी १ हजार रुपये किंमतीचा ७३ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये २ गुन्ह्यात ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा २५३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. २०१७ मध्ये ७ गुन्ह्यात १ हजार ५९ किलो ९४३ ग्रॅम वजनाचे ८ लाख ५३ हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. २०१८ मध्ये ९ गुन्ह्यात १५ हजार १५ किलो ३९५ ग्रॅम वजनाचा १ कोटी २६ लाख ३४ हजार ४९० रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. २०१९ मध्ये १४ गुन्ह्यांत ५ हजार ३५५ किलो ७४८ ग्रॅम वजनाचा ९२ लाख २९ हजार ४१७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जप्त केलेला अंमली पदार्थांचा मुद्देमाल मध्यवर्ती साठागृहात जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल नष्ट करण्यापुर्वी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. अंमली पदार्थ नष्ट करत असताना पर्यवरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मोठ्या आकाराचा खड्डा तयार करुन त्यात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा मुद्देमाल पुरण्यात आला.यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदी अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे