शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

५३ नवीन बंधाऱ्यांची होणार निर्मिती

By admin | Updated: December 26, 2016 22:55 IST

शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

ऑनलाइन लोकमतदोंडाईचा, दि. 26 -  शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार बुराई नदीत आता नव्याने ५३ ठिकाणी साठवण बंधारे तयार होणार असून त्यासाठी २० कोटी ६१ लाखांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी ४ महिने पाण्यात तर ८ महिने तहानलेली असते. त्यात पावसाअभावी तालुक्यातील पाण्याची टंचाई विचारात घेता, बुराई नदी काठावरील गावातील पाणी टंचाई आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.बंधारे नसल्यामुळे पाणी वाहून जाते शिंदखेडा मतदारसंघाच्या दृष्टीने बुराई नदी ही साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे परिसरासह शिंदखेडा तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या शेवाडे, चिमठाणे, शिंदखेडा, वरसुस येथून वाहत जाऊन थेट तापीला मिळते. नदीला दरवर्षी पावसाळ्यात पाणी असते. परंतु, पाणी अडविण्यासाठी बंधारे नसल्याने हे पाणी तापीनदीच्या प्रवाहाद्वारे वाहून जाते. त्यादृष्टीने मंत्री रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बुराई नदीला बारमाही करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. फेरप्रस्ताव सादर आघाडी शासनाच्या काळात मानव विकास मिशनमधून या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, आघाडी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. म्हणून राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री रावल यांनी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाला याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा सादर केला होता. याप्रश्नी अनेकदा बैठका झाल्या. अखेर ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असली तरी बुराई नदीच्या काठावरील दुसाणे, बळसाणे, म्हसाळे, उभंड, सतमाने, जखाणे, अमराळे, दरखेडा, चिमठाणे, शेवाळे, रेवाडी, कढरे, सुलवाडे, फोफरे, घाणेगांव, नागपूर, अशा विविध ठिकाणी ५३ साठवण बंधाऱ्यांची नव्याने निर्मिती होणार असून हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे.पाणी साठवणुकीवर भर मंत्री रावल यांनी हा प्रस्ताव तयार करताना शिंदखेडा मतदारसंघातील बुराई नदीतील बंधाऱ्यांमध्ये पूर्णत: पाणी साठवणूक होईल, असा प्रस्ताव तयार केला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्याचा दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मागील काळातील साठवण बंधाऱ्याचा कामाचा अनुभव पाहता मंत्री रावल यांनी बंधाऱ्यांची कामे दर्जेदार स्वरूपाची व्हावीत; तसेच त्यांचा पुढच्या ५० वर्ष जनतेला लाभ व्हावा म्हणून ही सर्व कामे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामाना प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कामांची गुणवत्ता राखण्यास मोठी मदत होणार आहे.