शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

५०० फुटाच्या टयूबवेलसुद्धा आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:44 IST

विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी शिल्लक

योगेश हिरे ।म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता़ ५०० फुटापर्यंतच्या टयूबवेलनेही तळ गाठले. आता मे महिन्यात विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी शिल्लक नसल्याने पाणी टंचाईची भिषण स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़.गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे़. या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे़. या भागात बहुसंख्य ट्युबवेल ३०० ते ५०० फुटापर्यंत आहेत़ परंतु दोन महिन्यापासून त्याही आटल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ अद्याप मे महिना काढायचा असताना आतापासूनच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़पिकांना पाणी देण्याची चिंतापाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येथील शेतकºयांनी जे काही खरीपाची थोडीफार पिक घेतली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे़. या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़सधन शेतकºयांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आहे़. परंतु इतर शेतकºयांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आहे़ मागील वर्षी ऐन पावसाळ्यातदेखील येथील पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते़ परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आहे़. त्यामुळे पिके जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे़.पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने गावातील शेत मजुरांना आपली रोजंदारीदेखील बुडवावी लागत आहे़. अशी स्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आहे़परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करुन येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे़.सध्या पाण्याचे सर्व स्रोत आटून गेलेले आहेत त्यामुळे गावाला पाणी पुरवठा वेळेवर व मुबलक प्रमाणावर करायला अडचण येत आहे.दीपक जैनसरपंच, म्हसदीपाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहे.भरत नेरेमाजी सरपंच, वसमारशेतांमध्ये सध्या तूर शेवगा पिके आहेत दोघे पिके ठिबकवर लागवड केलेली आहेत मात्र विहिरीने तळ गाठल्यामुळे फक्त 10ते 15 मिनिटेच पाणी पिकाला मिळते पाणी टंचाई व तापमानामुळे पिके करपत आहे. मे महिना व जून महिन्या मध्यावधीपर्यंत पिके कसे जगवायचे या चिंतेत आहे.ज्ञानेश्वर अहिरेशेतकरी, वसमार

टॅग्स :Dhuleधुळे