शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

४० कि़मी पाठलाग; गुरे नेणारी कार पकडली

By admin | Updated: February 25, 2017 23:55 IST

सोनगीर पोलिसांची कामगिरी : चोरटे फरार, चार गुरे ताब्यात, गुन्हा दाखल

सोनगीर/धुळे : सोनगीर पोलिसांनी शनिवारी पहाटे तब्बल ४० कि़मी पाठलाग करून गुरांची वाहतूक करणारी कार  तालुक्यातील रानमळा गावाजवळ पकडली़ मात्र चोरटे फरार झाले़ कारमध्ये एक गाय व तीन वासरांना निर्दयपणे कोंबण्यात आले होते़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन  पांझरापोळ येथे दाखल केली आहेत़ याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोनगीर पोलिसांच्या गस्ती पथकातील हेड कॉन्टेबल राजेंद्र पाटील व  रवींद्र राजपूत २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता सरवड येथून नंदाणेकडे जात असताना त्यांना एका कार भरधाव वेगाने जाताना आढळली़ संशय आल्याने त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला़ ती कार सरवड फाट्यापासून धुळे शहरात अवघ्या काही मिनिटात दाखल झाली़ पोलिसांनी तालुक्यातील रानमळा गावापर्यंत तब्बल ४० कि़मी.पर्यंत पाठलाग सुरू ठेवला़ पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्या गावाजवळ कार  अडविण्यात पोलिसांना यश आले़ मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित कार सोडून पसार झाल़े़ पोलिसांनी कार (क्ऱ एमएच २०- ४२०३) व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची एक गाय व ३ वासरे ताब्यात घेतली़ याप्रकरणी पो़हेक़ॉ. राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान पोलिसांनी ताब्यातील गुरे धुळ्यातील पांझरापोळ येथे दाखल केली आहे़