शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गवळी समाजाच्या मेळाव्यात ३ विवाह जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:48 IST

धुळे - गवळी समाजाच्या वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ३ विवाह जुळल्याची माहिती आयोजकांनी दिली. येथील संतोषी माता चौकातील कल्याण ...

धुळे - गवळी समाजाच्या वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ३ विवाह जुळल्याची माहिती आयोजकांनी दिली. येथील संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउदेशीय संस्थेने मेळाव्याचे आयोजन केले होते. गेल्या काळात कोरोनाने जगणे शिकवले म्हणून खर्चिक बाबींना फाटा देऊन सामूहिक विवाहांना प्राधान्य देण्याचा सूर गवळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात उमटला. मेळाव्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, पुणे, चाळीसगाव, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून २७० उपवर वधू - वरासह पालकांनी सहभाग नोंदविला.मेळाव्याच्या सुरुवातीला बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वालन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ पंच विठोबा बारसे होते. प्रमुख अतिथी म्हणून गणपत बिडकर (पुणे), लक्ष्मण खताडे (नगर), नगरसेवक भगवान गवळी, भागवत नागापुरे, लक्ष्मण खंदरकर, विठ्ठल उन्हाळे, नंदुरबार येथील संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, अशोक यादबोले, राजेंद्र लगडे, चाळीसगाव येथील नगरसेविका संगीता लगडे, सुभाष निस्ताने, सुपाजी पीरनाईक, अण्णाप्पा चिपडे, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा गठरी, रवींद्र परळकर, प्रकाश लंगोटे आदी उपस्थित होते. यावेळी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धाकलूआप्पा औशिकर, आणि धुळे तालुक्यातील बळाने ग्रामपंचायत सदस्य देवा आंजीखाणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भीमराज घुगरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू पंगुडवाले यांनी केले तर आभार ज्येष्ठ सल्लागार किसन जोमीवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जोमीवाळे, किशोर झारखंडे, नाना अंजीखाणे यांनी परिश्रम घेतले.३ विवाह जुळले - मेळाव्यात ३ विवाह जुळले. आणखी विवाह जुळण्याचा विश्वास संघटनेचे अध्यक्ष भीमराज घुगरे यांनी व्यक्त केला. संघटनेच्या वतीने दुसऱ्यांदा अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.