शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:33 IST

धुळे  : ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले तीव्र कुपोषित बालक, नियमित आहार दिला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील तब्बल पावणेदोन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून जिल्ह्यात ३५१ तीव्र तर १ हजार ३२३ बालके मध्यमस्वरूपाचे कुपोषित बालके आढळून आले आहेत. तीव्र कुपोषित असलेल्या  बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यातील २२७ ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले आहे. या  बालकांना अतिरिक्त आहार देण्यात येत असल्याची  माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली. धुळे जिल्ह्यात असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांतर्गत २१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील  शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील १ लाख ७३ हजार ८०६ बालकांची सुरुवातीला  अंगणवाड्यांमधील पर्यवेक्षिकांमार्फत  वजन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या बालकांची पुन्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ३५१  बालके तीव्र कुपोषित आढळले. ते वजन, वय व उंचीच्या प्रमाणात कमी आढळले.*तीन महिने ठेवणार*कमी वजन असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामबालविकास केंद्रात शुन्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना दाखल करण्यात येते. पूर्वी एकच महिना तीव्र कुपोषित  बालक बालविकास केंद्रात असायचा.आता मात्र या बालकांना तीन महिने या केंद्रात ठेवण्यात येणार  आहे.  धुळे जिल्ह्यात  जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी दहा प्रकल्पांतर्गत २२७  ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यात धुळे भाग-१ मध्ये १४, धुळे भाग-२मध्ये ३४, धुळे भाग ३ मध्ये ११, शिंदखेडा भाग-१मध्ये २२, शिंदखेडा भाग २ मध्ये ३५, शिरपूर भाग-१ मध्ये ३०, शिरपूर भाग २ मध्ये ३१, साक्री-१४, पिंपळनेर १३ व दहिवेल येथे २३ अशीएकूण २२७ ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. कुपोषित  बालकांची सख्या घटली : यापूर्वी जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत जिल्ह्यात बालविकास केंद्र सुरू करण्यात आली होती. त्यात ३४३१ तीव्र कुपोषित बालके दाखल करण्यात आली होती. या बालकांना नियमित आहार देण्यात आला. यातून तब्बल ३४१० बालकांचे वजन वाढून ते कुपोषणमुक्त झाले. तर केवळ १२ मुले कुपोषित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे