शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा विशेष अनुदानात २५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 11:49 IST

विकास कामांना येणार गती : दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानापैकी काही रक्कम अखर्चित

ठळक मुद्देशहरात रस्ते, गटारी व अनुषंगिक मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून विशेष निधी दिला जातो़महापालिकेला मुलभूत सेवा सुविधांसाठी दरवर्षी मागणीनुसार निधी मिळतो़ महापालिकेने २०१२ ते २०१४ या तीन वर्षात शासनाकडे विशेष निधीसाठी प्रस्तावच पाठविण्यात आलेला नव्हता़ 

आॅनलाईन लोकमतधुळे : महापालिकेला मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी मिळणाºया विशेष अनुदानात शासनाने २५ टक्के घसघशीत वाढ केली आहे़ त्यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळणार आहे़ दोन वर्षांपूर्वी मनपाला १५ कोटींचे विशेष अनुदान मिळाले होते, त्यातून मनपाची नवीन प्रशासकीय इमारत आकाराला येत आहे़ ससेहोलपट थांबणारशहरात रस्ते, गटारी व अनुषंगिक मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून विशेष निधी दिला जातो़ त्यासाठी प्रत्येक विभागाच्या कामांची निकड लक्षात घेऊन शासनाला प्रस्ताव सादर केला जातो़ त्यानुसार ५० टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते तर उर्वरीत ५० टक्के तरतुद महापालिकेला करावी लागते़ दरम्यान, आता शासनाकडून मिळणाºया अनुदानात २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय झाल्याने महापालिकेला विशेष निधींतर्गत ५० ऐवजी ७५ टक्के अनुदान मिळणार असून मनपाला केवळ २५ टक्के हिस्सा टाकावा लागणार आहे़ त्यामुळे मनपा प्रशासनाची आर्थिक ससेहोलपट कमी होणार आहे़ आधीचाच निधी अखर्चितमहापालिकेला मुलभूत सेवा सुविधांसाठी दरवर्षी मागणीनुसार निधी मिळतो़ मात्र महापालिकेने २०१२ ते २०१४ या तीन वर्षात शासनाकडे विशेष निधीसाठी प्रस्तावच पाठविण्यात आलेला नव्हता़ ही बाब लक्षात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला़ त्याचप्रमाणे राजकीय पाठपुरावा सुरू झाल्याने महापालिकेला २०१५ मध्ये एकाच वेळी १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला़ या निधीतून महापालिकेने १० कोटी रूपये खर्चून प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असून उर्वरीत निधीतून रस्त्याची व गटारींची कामे मार्गी लावण्यात आली आहेत़ पण मनपा हिश्यांची पुरेशी रक्कम टाकली न गेल्याने काही कामे अर्धवट राहिली असून शासन अनुदानातील काही निधी अखर्चित राहिला आहे़ त्यामुळे दोन वर्षांपासून या अनुदानासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आलेला  नाही, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे़ शासनाकडून विकास कामांसाठी निधी मंजूर होऊनही मनपा हिश्यांच्या रक्कमेची तरतूद होत नसल्याने विकास कामांवर परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले़ या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व २६ महापालिकांच्या मुलभुत सेवा सुविधा अनुदानात २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे़  या निर्णयाचा महापालिकेला निश्चितपणे लाभ होणार आहे़ मनपा हिस्सा टाकतांना दमछाकराज्य शासनामार्फत  स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलभुत सेवा सुविधा या लेखाशिषार्खाली विशेष अनुदान दिले जाते़ मात्र, या अनुदानात स्थानिक स्वराज्य संस्थांना निम्मे म्हणजेच ५० टक्के हिस्सा द्यावा लागत होता़ आर्थिक अडचणी असलेल्या संस्थांना या रक्कमेची तरतुद करतांना तारेवरची कसरत करावी लागत होती़  केवळ विशेष अनुदानातच नव्हे तर शासनाच्या प्रत्येक योजेनेत मनपा हिस्सा टाकतांना मनपाची चांगलीच दमछाक होते़