शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

महिलांसाठी २८ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २३ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:10 IST

जिल्हा परिषद : गट, गणांची अंतिम प्रभाग रचना, मतदारयादी तयार करण्याबाबत सूचनेची शक्यता 

धुळे : जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील चारही पंचायत समित्यांच्या गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्यानुसार महिलांसाठी २८ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २३ जागा राखीव असणार आहेत. या रचनेवर प्राप्त हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आली. त्यात ४९ पैकी ४८ हरकती फेटाळण्यात आल्या. केवळ एक हरकत मान्य करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या वर्षी जिल्हाधिकाºयांनी गट, गणांची रचना जाहीर करून आरक्षण काढले होते. त्याविरोधात काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतरही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यानंतर जि.प., पं.स. निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाचे कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची रचना व सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसह राखून ठेवलेले विभाग व निर्वाचक गण दर्शविणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध केला. त्यावर २० हरकती आल्या. स्थगिती मिळण्यापूर्वी २९ हरकती आल्या होत्या. त्यामुळे या एकूण ४९ हरकतींवर नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे  सुनावणी झाली. त्यांनी ४९ पैकी ४८ हरकती फेटाळल्या. मान्य केलेली एक हरकत शिरपूर तालुक्यातील होती. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या अधिक आहे त्या गावाचे नाव त्या गणास द्यावे, अशी सूचना या हरकतीत नमूद होती. ही हरकत मान्य करण्यात आली. त्यानुसार मोठ्या ग्रामपंचायतीचे नाव त्या गणाला दिले जाणार आहे. त्या नंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. आता मतदार यादी तयार करण्याबाबत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे