शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील 164 गावांना अद्याप टंचाईच्या झळा!

By admin | Updated: May 27, 2017 18:04 IST

जिल्ह्यातील सद्यस्थिती : 18 गावांना 14 टॅँकरद्वारे, 119 गावांना खाजगी विहिरी, हातपंपाद्वारे पाणीपुरवठा

ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.27 - पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून टंचाईच्या शेवटच्या टप्प्यात अद्याप सुमारे 164 गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यापैकी 18 गावांना 14 टॅँकरद्वारे, 108 गावांना खाजगी विहिरी अधिग्रहित करून, 17 गावांना तात्पुरत्या योजना आणि 11 गावांना विंधन विहिरींवर हातपंप बसवून पाणीपुरवठा केला जात आहे. शेवटच्या टप्प्यात टंचाई आणखी तीव्र  होण्याची शक्यता असून जून महिन्यात अजून 10 गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. 
17 गावांसाठी टॅँकर सुरू 
जिल्ह्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री व शिंदखेडा या तीन तालुक्यांमधील 17 गावांसाठी सध्या 14 टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे व कुंडाणे (वे.), अजंग आणि साक्री तालुक्यातील सालटेक व कढरे या 4 गावांसाठी स्वतंत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 13 गावांसाठी 10 टॅँकर सुरू आहेत. त्यात दत्ताणे व अजंदे गावांसाठी एक, मेलाणे व विटाई गावांसाठी एक आणि दाबली व धांदरणे गावांसाठी एक टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या शिवाय वारूड, पथारे, भडणे, तामथरे, चांदगड, वरूळ घुसरे व चुडाणे आदी गावांना स्वतंत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 14 टॅँकरमध्ये दोन खाजगी टॅँकर्सचा समावेश आहे. 
119 गावांना खाजगी विहिरींचा ‘आधार’
जिल्ह्यात धुळे तालुक्यात नवलाणे, आर्णि, बेहेड, नावरा, धमाणे, चिंचवार, आंबोडे, वडगाव व धाडरा या 8 गावांसाठी खाजगी विहीर व नावरी, धमाणे या 2 गावांसाठी विंधनविहीर (बोअर) अधिग्रहित करण्यात आली आहे. 
साक्री तालुक्यात 27 गावांसाठी खाजगी विहीर तर 5 गावांसाठी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. 
शिंदखेडा तालुक्यात 47 गावांसाठी खाजगी विहीर तर 15 गावांसाठी खाजगी विंधनविहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यात ङोंडेअंजन, नटवाडे (खोलचौकी) या 2 गावांना खाजगी विहीर तर पारशीपाड व अंबडपाडा (वरझडी) येथे खाजगी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. 
तात्पुरत्या योजना; 19 गावांना  दिलासा  
जिल्ह्यात 19 गावांना तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 17 पूर्ण झाल्या असून दोन प्रगतीपथावर आहेत. 19 योजनांपैकी साक्री तालुक्यातील शिरसोले व फोफरे वगळता सर्व योजना पूर्ण होऊन त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. 
सर्व 11 बोअर यशस्वी 
कृती आराखडय़ांतर्गत उपाययोजना म्हणून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या 11 ठिकाणी विंधनविहिरी (बोअर) यशस्वी झाल्या. तेथे हातपंप बसविण्यात आल्याने ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. साक्री तालुक्यातील ककाणी व शेवाळी येथे विहीर खोल करण्याच्या उपाययोजनेस 11 मे रोजी मान्यता देण्यात आली असून काम प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.