शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात सायबर क्राईमचे १५ गुन्हे!

By admin | Updated: February 23, 2017 00:25 IST

धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. मोबाइलद्वारे बँक खात्याची माहिती घेऊन  लुबाडणूक होण्याबरोबरच आता फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मुली व महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी असे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल होते़क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे फसवणूक, फेसबुकवर अश्लील फोटो किंवा पोस्ट टाकणे, तरुणींची, महापुरुषांची बदनामी करणे, मोबाइलवरून त्रास देणे, आॅनलाइन फसवणूक अशा घटना वाढल्या आहेत़ त्यामुळे सायबर गुन्हे हा आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप यासारखी संपर्काची अनेक माध्यमे आहेत. जिल्ह्यात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, आता त्याचा गैरवापर वाढू लागला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोबाइलद्वारे बँक खात्याबाबत माहिती घेऊन फसवणुकीसह फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दुसºयाला त्रास देणे, बदनामीबाबतचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झाले होते़ त्यामुळे गेल्या वर्षी सायबरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते़ दरम्यान सायबर सेल हा विभाग आता वेगळा झाला असल्यामुळे अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. काय करावे, काय करू नयेसोशल मीडियातून वाढणाºया गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे. फेसबुकवर खाते बनविताना ते कोणी पाहू नये, असे सेटिंग करून घेणे आवश्यक आहे.  फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला आपला मित्र बनवणे टाळणे गरजेचे आहे. अनोळखी लोकांकडून आपल्या खासगी फोटो व व्हिडिओंचा गैरवापर केला जाऊ शकतो. तसेच मोबाइलवर फोन करून काही बतावणी करून कोणी आपल्या बँक खात्याची माहिती मागत असेल तर ती देऊ नये़ ३ ते ५ वर्षांची शिक्षासोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ तयार करणे, कोणीतरी अपलोड केलेला मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे, लाईक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबद्दल माहिती तंत्रज्ञान, भारतीय दंडविधान संहितेत ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.