शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाखांचा अपहार केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:01 IST

कापडणे : गावात ७०० शोषखड्डे कागदोपत्री दाखविण्यात आल्याची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावात ७०० शोषखड्डे करण्यात आल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून १४ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.८ जुलै रोजी कापडणे ग्रामस्थ व पदाधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना तक्रार अर्ज देण्यात आला. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता कापडणे गावासाठी ७०० शोषखड्डे मंजूर झाले होते. त्यापैकी एकही शोषखड्डा गावात झालेला नाही. परंतू गावातील सातशे ग्रामस्थांकडे कागदोपत्री शोषखड्डे झाल्याचे दाखविण्यात आले असून सर्व पैसे परस्पर काढून तब्बल १४ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे शासकीय कागदपत्रांमध्ये ज्या ग्रामस्थांना लाभार्थी म्हणून दाखवून पैसे काढण्यात आले आहेत, त्या ग्रामस्थांना या योजनेविषयी अजूनही कोणतीच माहिती नाही. गावातील १५ अंगणवाडी, ५ जिल्हा परिषद शाळा, ४ माध्यमिक शाळा आदी ठिकाणी देखील शोषखड्डे झाल्याचे दाखविण्यात आले आहेत व त्यांचे अनुदानही काढण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात वरील एकाही ठिकाणी शोषखड्डा झालेला नाही. तसेच एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी नावे दाखवून अनुदान हडप करण्यात आले आहे. या प्रकरणाची,  झालेल्या भ्रष्टाचाराची  वाच्चता होऊ नये म्हणून कापडणे ग्रामपंचायतकडे असलेले महत्त्वाचे दप्तर देखील मुद्दाम गहाळ करण्यात आले आहेत. योजना फक्त कागदोपत्री दाखवून सर्वच रक्कम हडप करण्यात आली आहेत. त्यात ठेकेदार, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, रोजगार सेवक, तसेच प्रशासनातील अधिकाºयांनी संगनमत करून अपहार केला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा उपोषण करण्यात येईल. तसेच त्यात अशांतता निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ललित मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल यादवराव पाटील, भटू विश्राम पाटील, सतिष वसंत पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र बाबुराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ दगा भिल, योगेश बाबुराव पाटील, नारायण शंकर पाटील, किशोर रोहिदास बोरसे, निलेश धनराज पाटील, बन्सीलाल बाबुराव पाटील आदींनी तक्रारी अर्जाद्वारे दिला आहे.ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारायोजना फक्त कागदावर दाखवून अनुदान हडप करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कापडणे दप्तरी असलेली कागदपत्रे गहाळ करण्यात आली आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून सर्व प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी अर्जाद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे