शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहन पलटी झाल्याने ११ जण जखमी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:20 IST

गोराणे शिवार : जीवितहानी टळली

धुळे : धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने जाणारे वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर चढून खोल असलेल्या चारीत पलटी झाले़ या अपघातात ११ जणांना दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली़ ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ नरडाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखत असताना मजुरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे़ अशातच एक वाहन धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते़ शिंदखेडा तालुक्यातील गोराणे गावाच्या शिवारात हे वाहन आल्यानंतर भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले़ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालविले जात असल्यामुळे वाहनाने अगोदर दुभाजकावर आदळले़ वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल चारीत जावून कोसळले़या अपघातात रईस इकबाल अहमद शेख, अंजुम बेगम शेख, रशिद रईस शेख, आदिल रईस शेख, आफात अहमद शेख, मोहम्मद फैज शेख, महकूज सलिम शेख, कलाम अब्बास शहा, काशिम रईस शेख, तहसिम रईस शेख, मोहम्मद रईस आरिफ शेख यांना दुखापत झाली आहे़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात आसिफ अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीवरुन शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे