शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात ६० टन गॅलन वांग्याचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रयोगशील शेतकरी महेश विठ्ठलराव मोकाशे यांनी बीएस्ससी ॲग्रीचे शिक्षण घेऊन ग्रामसेवकाची नोकरी स्वीकारली. ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रयोगशील शेतकरी महेश विठ्ठलराव मोकाशे यांनी बीएस्ससी ॲग्रीचे शिक्षण घेऊन ग्रामसेवकाची नोकरी स्वीकारली. परंतु, त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने शासकीय नोकरी करतच आपल्या शेतात दीड एकर शेती क्षेत्रात गॅलन जातीच्या वांग्याची लागवड केली. यात त्यांना चांगला उतार मिळाला असून, त्यांनी ६० टन वांग्याचे उत्पन्न काढले आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून, यात त्यांना जवळपास ४ लाखांचा फायदा तर ४ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.

महेश मोकाशे हे आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये विविध नवनवीन शेती प्रयोग, तंत्रज्ञानाचा वापर करतात. चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट केले की शेतातही यश निश्चित मिळते असा त्यांना विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी गतवर्षी ३ एकरामध्ये २१० टन पपईचे विक्रमी लाखो रूपयांचे त्यांनी उत्पन्न घेतले होते. तर यावर्षी आंतर पीक काकडी घेऊन २ लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. मोकाशे यांची आधुनिक शेती पाहण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी त्यांच्या बांधावर येत असतात.

यावर्षी मोकाशे यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये ५ हजार रोपे गॅलन वांग्याची लावली होती. त्यांना यासाठी मजुरीसह २५ हजार रूपयांचा खर्च आला. ड्रिपच्या सहाय्याने वेळच्या वेळी पाणी, योग्य वेळी औषधे, कीटकनाशके फवारणी केल्यामुळे प्रत्येक झाड फळाने लगडले आहे. हे पीक सहा महिन्याचे असून, याची लागवड त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस केली होती. गॅनल वांग्याचा ६० दिवसानंतर पहिला तोडा सुरू झाला. ही वांगी निळसर रंगाची असून, याचे वजन ६०० ते ८०० ग्रॅम भरते. या वांग्यांना भरता वांगे म्हणून ग्रामीण व शहरी भागात मोठी मागणी आहे. मात्र, यावर्षीही कोरोना महामारीमुळे राज्य व केंद्र शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. शिवाय जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बाजारपेठ बंद आहेत. याचा फटका मोकाशे यांचा गॅनल वांगी उत्पन्नाला बसला आहे. बाजारपेठेतील भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने २० ते २५ रूपये किलोने जाणारी वांगी सद्य घडीला १० ते १२ रूपये किलोने विकण्याची वेळ मोकाशे यांच्यावर आली आहे. यातून ८ लाख रूपयांचा मिळणारा फायदा केवळ ४ लाखांवर आला. त्यामुळे त्यांना सुमारे ४ लाख रूपयांचा फटका सहन करावा लागला.

महेश मोकाशे हे शेतीमध्ये विविध व नवनवीन प्रयोग करतात. तसेच कोणत्याही पिकांमध्ये अंतर्गत पीक घेतात. त्यामुळे शेतीमध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च अंतर्गत पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून होतो आणि मुख्य पिकाचा झालेला निव्वळ नफा शिल्लक राहतो. मात्र, यावर्षी गॅनल वांग्यातून मिळणारा निव्वळ नफा हाती न पडल्याने त्यांना ४ लाखांचा फटका बसल्याचे मोकाशे यांनी सांगितले.

चौकट......

शेतकऱ्यांनी कोरोना, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कोणतीही आपत्ती आली म्हणून निराश न होता चिकाटीने आपल्या शेतात राबावे. शाश्वत शेती करण्यासाठी प्रयत्न करावे, लहान-लहान बाजारपेठा शोधण्यापेक्षा मोठ्या बाजारपेठेकडे लक्ष ठेऊन गुंठ्यांमध्ये उत्पन्न न घेता एकरावर उत्पन्न काढावे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून आपली शेती करावी, असे आवाहन शेतकरी महेश मोकाशे यांनी शेतकऱ्यांना केले.

फोटो--- अणदूर येथील महेश मोकाशे यांच्या शेतात गॅलन वांग्याचा केलेला प्लाॅट व केलेला वांग्याचा तोडा