शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्तरीय समित्या सक्रिय हाेणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

माणकेश्वर : ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याची ...

माणकेश्वर : ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याची गरज आहे. या समित्यांनी काेराेनाच्या पहिल्या लाटेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली हाेती.

काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे शंभराच्या आसपास तर पाथरूडमध्ये ७० ते ८० रुग्ण आहेत. इतर गावांतही कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अनेकजण काेराेना टेस्ट न करता खासगी डाॅक्टरांकडून उपचार करून घेत आहेत. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता जाेरदार प्रयत्न हाेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या पुन्हा सक्रिय करणे गरजेचे आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराघरांत सर्वे करून आजारी असणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यावर उपचाराबाबत आरोग्य विभागाला कळवणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या या संकटात आरोग्य विभागावर कामाचा भार अधिक असल्याने गावागावांत कॅम्प घेता येत नसले तरी गावातील आजारी व्यक्तींना शासकीय रुग्णालयात आणण्यासाठी कुटुंबातील सदस्य,ग्राम समिती सदस्य यांच्यावर जबाबदारी देता येईल. याबाबत विचार करून प्रशासनाने योग्य कारवाई करावी व लॉकडाऊनचे नियम ग्रामीण भागातही कडक लागू करावेत, अशी मागणी केली जात आहे.