शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पाटी पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात रिॲलिटी चेक केला ...

औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात रिॲलिटी चेक केला असता येथे खरेदी-विक्रीची भानगड दिसली नाही. मात्र, पालकच अवघ्या दोन-अडीच वर्षांच्या मुला-मुलींना भीक मागण्यासाठी पाठवत असल्याचे दिसून आले. भीक मागणाऱ्यांमध्ये दहा-बारा वर्षाच्या मुलीच्या पाठीवर लहान बाळ बांधून भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. कमी श्रमात मिळणाऱ्या चांगल्या भीकेमुळे लहान बालकांची या क्षेत्रात वाढत होत चालली आहे. तुळजापुरात एक ते पाच वर्षांचे जवळपास २५ मुले-मुली आहेत. तर पाच ते दहा वर्षाचे पुढील २० मुले-मुली तर दहा ते अठरा वर्षाचे २० मुले-मुली तुळजाभवानी मंदिरासमोर भीक मागतात. त्यातील अनेकांचे पालक तर स्वत:चे व्यसन पूर्ण करण्यासाठी मुलांना भीक मागण्यास पाठवत असल्याचेही समोर आले आहे.

सकाळीच शहरात...

तुळजापूरपासून दोन ते तीन कि.मी.अंतरावर असलेल्या वस्तीवरील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही मुले भीक मागण्यासाठी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पायी, मिळेल त्या वाहनाने तुळजापुरात दाखल होतात. दिवसभर मंदिरासमोर भीक मागतात आणि सायंकाळी आप-आपल्या घरी निघून जातात. त्यांचा हाच रोजचा दिनक्रम आहे.

तसेच काही भीक मागणारी मुले-मुली या नळदुर्ग रस्त्यावरील झोपड्यात राहतात. त्यातील काही मुले श्री तुळजाभवानी मंदिरासमोर हळदी-कुंकू मिश्रित छापे मारतात, तर काही दिवसभर भीक मागून पैसा गोळा करणारी मुलं गुटखा खाण्याच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. फुकटात मिळणाऱ्या पैशांमुळे व गरज भागत असल्याने पालकही त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत.

कोट...

भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये १३ ते १५ वयोगटांतील मुलींचे त्याच्या नातेवाईकांकडून शोषण होत असल्याचे समोर आले आहे. मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावून बरेच पालक स्वतः नशापाणी करीत त्यांच्यावर देखरेख करतात. आठ ते दहा वर्षाची मुले-मुली स्वतःच्या काखेत झोळी घालून झोळी बांधून एक ते दोन महिन्यांचे बाळ झोपवून भाविकांना भीक मागत असल्याचेही चित्र आहे. बालकांना त्यांचे अधिकार मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. बालभिक्षेकरी शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

-संजयकुमार बोंदर, सदस्य, बाल सहाय्य पोलीस पथक

050921\20210905_124204.jpg

भीक मागणारी मुले