शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वाशीचा वीजपुरवठा ३४ तास खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

वाशी : येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील दोन मुख्य ट्रान्सफार्मरपैकी एक पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर दुरुस्त होऊन चालू ...

वाशी : येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील दोन मुख्य ट्रान्सफार्मरपैकी एक पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर दुरुस्त होऊन चालू होतो न होतो तोच मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व विजांच्या कडकडाटांमुळे वीजवाहिनीत बिघाड होऊन २४ तास तर तत्पूर्वी ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी १० तास असा एकूण ३४ तास शहराचा वीजपुरवठा बंद राहिला.

वाशी येथील ३३/११ उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे शहरातील वीजपुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत होता. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविल्याने ही समस्या दूर झाली. परंतु, याच दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भूम ते वाशी या मुख्य वाहिनीवर वीज पडल्याने शहरासह परिसराचा वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. तो बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरू झाला. यामुळे तब्बल चोवीस तास व तत्पूर्वी ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी दहा तास वीज बंद राहिल्याने नागरिकांचे विजेअभावी मोठे हाल झाले.

सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने नागरिक घरात बसून आहेत. शिवाय, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडण्याची मुभा आहे. यामध्ये प्रामुख्याने दूध विक्री, पिठाची गिरणी आदी व्यावसायिकांना विजेच्या लपंडावाचा मोठा फटका बसत आहे. शहरात कोविड सेंटरलादेखील विजेच्या लपंडावाचा फटका बसत आहे. शहरासह परिसरात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी असून, सुरळीत विजेअभावी त्यांनाही कोंबड्यासाठी लागणारे खाद्य बनविण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह इतर पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होत असून, काही शेतकऱ्यांना तर दावणीच्या जनावरांना पाणी देतानाही मोठी कसरत करावी लागत आहे.