शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी पूरक हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : विद्यापीठ, उपकेंद्र यामधून चालणारे अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी सुसंगत असायला हवेत. जेणेकरून या भागातील अडचणींवर कौशल्याने मात ...

उस्मानाबाद : विद्यापीठ, उपकेंद्र यामधून चालणारे अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी सुसंगत असायला हवेत. जेणेकरून या भागातील अडचणींवर कौशल्याने मात करीत विकास साधता येऊ शकतो, असे मत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचा सोमवारी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमास कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्याम सिरसाठ, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. जयसिंगराव देशमुख, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू येवले म्हणाले, विद्यापीठाच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये विकसित झाली पाहिजेत. तर विद्यार्थी पुढे कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो. बी. बी. ठोंबरे म्हणाले, वरचेवर व्यावसायिक अभ्यासक्रमांची गरज ठळकपणे अधोरेखित होत चालली आहे. विशेषत: शेतीपूरक व्यवसायांशी सुसंगत अभ्यासक्रमांची अधिक गरज आहे. भविष्यात शेती क्षेत्रातूनच पुनर्निर्मिती ऊर्जा स्त्रोत तयार करावे लागतील. यातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यास मदत होईल, असेही ठोंबरे म्हणाले. सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी उपकेंद्रातील शैक्षणिक, संशोधनात्मक कार्याचे कौतुक करून लोकसहभाग व विद्यापीठाच्या मदतीने उभी झालेली कोविड लॅब ही शिक्षणासोबतच सामाजिक दायित्वाची जबाबदारी पूर्ण करणारी ठरली, असे सांगितले. प्रास्ताविक संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोविंद कोकणे यांनी केले तर आभार डॉ. जयश्री गायकवाड यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन देशमुख, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. स्मिता अवचार, डॉ. राहुल मस्के यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

अशोक मोहेकर यांना जीवनसाधना...

प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांनी ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चालविलेल्या ज्ञानयज्ञाचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विद्यापीठाच्यावतीने यंदाचा जीवनसाधना पुरस्कार कुलगुरू डॉ. येवले यांच्या हस्ते प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. मोहेकर यांनी हा पुरस्कार त्यांचे वडील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना समर्पित करीत विद्यापीठाचे आभार मानले. दरम्यान, याच कार्यक्रमात डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. एस. ए. अमृतराव यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तर उपकुलसचिव डॉ. डी. एम. नेटके, डॉ. जे. एस. शिंदे, कर्मचारी एन. एस मस्के, एस. टी. वाघमारे, एम. आर. खंडागळे, किरण शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.