शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उमरगा नगर परिषदेस दर्जावाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

उमरगा : येथील नगर परिषदेस दर्जावाढ देऊन ‘ब’ वर्गामध्ये समावेश करण्यात यावा, अशी ...

उमरगा : येथील नगर परिषदेस दर्जावाढ देऊन ‘ब’ वर्गामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सेनेचे आमदार ज्ञानराज चाैगुले यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १५ जून राेजी केली आहे.

उमरगा हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. या नगर परिषदेस सध्या क वर्ग दर्जा प्राप्त आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराच्या हद्दीतील व हद्दवाढ भागातील लोकसंख्या ६०,००० इतकी आहे. क वर्ग दर्जा प्राप्त नगर परिषद व वाढलेली लोकसंख्या याचा विचार करता नगर परिषदेस शासनाकडून येणारे अनुदान आकृतिबंधानुसार उपलब्ध अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून शहरवासीयांना मूलभूत सोयीसुविधा पुरविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही निकड ओळखून उमरगा नगर परिषदेकडून क वर्ग दर्जावाढ करून वर्ग ब मध्ये समावेश करावा, यासाठी २०१३ मध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदरील दर्जावाढ झाल्यास शासनाकडून येणाऱ्या अनुदानात वाढ होऊन यातून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे सोयीचे होईल. तसेच आकृतिबंधानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येत वाढ होऊन याचा फायदा शहरवासीयांना विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी होईल. तसेच अनेक तांत्रिक प्रक्रिया सुलभ होऊन नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.

या सर्व बाबींचा विचार करून उमरगा नगर परिषदेस वर्ग क मधून वर्ग ब मध्ये दर्जावाढ देण्यात यावी, असे साकडे आमदार चौगुले यांनी नगरविकासमंत्री शिंदे यांना घातले आहे. दरम्यान, याअनुषंगाने तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आ. चाैगुले यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

केली असून, मंत्रिमहोदयांनी यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासित केले आहे.