शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कामगार पक्षाचे लाक्षणिक उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

आंदाेलन -शिवरायांच्या पुतळ्याचे सुशाेभिकरण करा तुळजापूर : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ ...

आंदाेलन -शिवरायांच्या पुतळ्याचे सुशाेभिकरण करा

तुळजापूर : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी नगरपालिकेसमोर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी लाक्षणिक उपाेषण करण्यात आले.

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवावा. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जनतेचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना शहरात आल्याबरोबर तमाम रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचेही दर्शन व्हायला पाहिजे होते; परंतु, मागील तीन वर्षांत काहीच झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुतळ्याविना होत असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे पुतळ्याचे तातडीने सुशाेभीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पालिकेसमाेर गुरुवारी लाक्षणिक उपाेषण करण्यात आले. आंदाेलनामध्ये नगरसेवक भाई राहुलजी खपले, राष्ट्रवादीचे गोकुळ शिंदे, रिपाइंचे आनंद पांडगळे, तानाजी कदम, सेनेचे सुधीर कदम, नगरसेवक अमर मगर, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके, जिजामाता प्रतिष्ठानचे मधुकर शेळके, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप गंगणे, लखन पेंदे, नगरसेवक सुनील रोचकरी, भाई उत्तम अमृतराव, महेश चोपदार आदी उपस्थित हाेते.

चाैकट...

आंदाेलनास यांचाही पाठिंबा...

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केलेल्या आंदाेलनास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (अ), बजरंग दल, प्रहार संघटना, लहुजी सेना, जनसंघटनेने पाठिंबा दिला.