शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तुळजापूरकर धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:37 IST

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापुरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, सद्य:स्थितीत तालुक्याची रुग्णसंख्या पाऊणशेवर जाऊन पोहोचली आहे. यातील पन्नास ...

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापुरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, सद्य:स्थितीत तालुक्याची रुग्णसंख्या पाऊणशेवर जाऊन पोहोचली आहे. यातील पन्नास टक्के रुग्ण तुळजापूर शहरातील असल्याने तुळजापूरकरांत चिंता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी तुळजापूर शहरात ११ तर ग्रामीण भागात ६ कोरोना रुग्ण आढळले. यामुळे आता तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७१ वर पोहोचली आहे. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील लोकांना होम क्वारंटाइन केले असून, शनिवारी आणखी पन्नास जणांचे टेस्ट रिपोर्ट तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे तुळजापूरकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. तुळजापूर शहरात परगावाहून व इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांमध्ये पुजाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

एकीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीकडे मात्र नागरिकांचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थी बिनधास्तपणे विनामास्क वावरताना दिसतात. यावर प्राध्यापकांनी विचारणा केली असता त्यांना कुठलीही दाद न देता विद्यार्थी ऐकून न ऐकल्यासारखे करतात. शिवाय, बहुतांश शहरवासीयदेखील मास्क, फिजिकल डिस्टन्स याकडे कानाडोळा करीत आहेत. दरम्यान, शहरात अशाच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत गेल्यास प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील व हे निर्णय पुजारी व व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे. तसेच पुजारी बांधवांनी भाविकांची पूजा झाल्यानंतर त्यांना घरी नेण्याचे टाळावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

कोट.......

शहरातील वाढती कोरोना रुगणसंख्या ही मंदिर प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मंदिर प्रशासनाने यासंदर्भात सर्व ती खबरदारी घेतली आहे. सर्व उपाययोजना केल्या आहेत. परंतु, येणारे देवी भाविक पुजाऱ्यांच्या घरी कुलाचार विधी करण्यासाठी जातात. यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपण मंदिर व्यवस्थापक या नात्याने तिन्ही पुजारी मंडळाशी बैठक घेऊन भाविकांना घरी नेऊ नये, असे आवाहन केले आहे. ७५ टक्के पुजारी याचे काटेकोर पालनदेखील करतात, परंतु काही पुजारी याचे पालन करत नाहीत.

- सौदागर तांदळे, तहसीलदार

कोट.......

मंदिर प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन पुजारी करीत आहेत. भाविकांना घरी नेत नाहीत. तरीदेखील शहरात कोराेना वाढत आहे. याला कारण म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीशी शहरवासीयांचा संपर्क असावा. या वाढत्या कोरोनाशी मंदिर व पुजारी यांचा काही संबंध नाही.

- बिपीन शिंदे, उपाध्यक्ष, पाळीकर पुजारी मंडळ

कोट.....

शहरातील वाढता कोराेना रोखण्यासाठी नगरपालिकेने विविध पथकांची नेमणूक केली असून, त्यांच्याद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करून सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देत आहोत. तसेच यासंदर्भात रविवारी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत शहरातील तिन्ही पुजारी मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नगरसेवक यांची बैठक घेऊन शहरातील कोरोना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार आहे.

- आशिष लोकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद