शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या मित्रावरही काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

अणदूर : मित्राचे निधन झाल्याची वार्ता कळताच जड अंतःकरणाने पुणे येथील तिघे मित्र अंत्यसंस्कारासाठी येत हाेते. ते इंदापूरनजीक आले ...

अणदूर : मित्राचे निधन झाल्याची वार्ता कळताच जड अंतःकरणाने पुणे येथील तिघे मित्र अंत्यसंस्कारासाठी येत हाेते. ते इंदापूरनजीक आले असता, रिक्षाला अपघात झाला. या घटनेत अणदूर येथील एकाचा ६ मे राेजी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शाेककळा पसरली.

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष साेमनाथ कांबळे यांचे ४ मेच्या रात्री निधन झाले हाेते. मित्राच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे पुणे येथील मित्र उमेश गीरजाप्पा सगट व अन्य दाेघे काटगावच्या दिशेने निघाले. त्यांची रिक्षा इंदापूरनजीक आली असता अपघात झाला. या दुर्घटनेत तिघेही जखमी झाले. गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने उमेश सगट यांना तातडीने साेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. थाेडाही विलंब न करता, त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ मे राेजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथील हाळावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.