सार्वजनिक ठिकाणी थुंकणे भाेवले
उस्मानाबाद - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या विविध भागांत आठ कारवाया करण्यात आल्या. त्यांच्याकडून जवळपास एक हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३२ जणांविरुद्ध (नागरिक व व्यापारी) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे सहा हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवली जाणार असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद -जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मास्कचा वापर तसेच दुकानासंबंधी वेळेचे निर्बंध घालून दिले आहेत. या अनुषंगाने आदेशही जारी केले आहेत. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ढाेकी येथील एका टपरीचालकाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी केले.
पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण
उस्मानाबाद - पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ का केली, असा जाब आदर्श माेहन वाघमाेडे (रा. इंदिरा नगर, नळदुर्ग) यांनी गल्लीतीलच श्रीकांत देवकते यांना विचारला हाेता. याचा राग धरून देवकते यांनी आदर्श वाघमाेडेयांना शिवीगाळ तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी वाघमाेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन
उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १८ पाेलीस ठाणी व वाहतूक शाखेकडून ३ जुलै राेजी १८१ कारवाया करण्यात आल्या. त्यांच्याकडून तडाजाेड शुल्कापाेटी सुमारे ३८ हजार २०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवली जाणार आहे. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.