शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटस्पाॅट भागात दहा दिवस सक्तीचे लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

उमरगा : तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रभाव व वाढती रुग्णसंख्या पाहून पंचायत समिती प्रशासन ॲक्शन माेडवर आले आहे. ...

उमरगा : तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रभाव व वाढती रुग्णसंख्या पाहून पंचायत समिती प्रशासन ॲक्शन माेडवर आले आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करीत प्रत्येक शाळेतील वर्गखाेल्यांत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. साेबतच हाॅटस्पाॅट गावांत दहा दिवस सक्तीचे लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

उमरगा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून, सध्याच्या घडीला ग्रामीण भागात ६२६ कोरोना रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले असून, फेब्रुवारी ते आजपर्यंत २९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पंचायत समितीकडे आहे. त्यांच्यावर उपचार चालू असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावर मोठा ताण पडत आहे. उपचारासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यास अडचणी येत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. शहरात जाण्यास कित्येक जण टाळाटाळ करीत असून, हा आजार अंगावर काढत आहेत. या सर्व बाबीचा विचार करून उमरगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी प्रभावी उपाययोजनेची आखणी सुरू केली आहे. तालुक्यात ८० ग्रामपंचायती असून, वाडी-वस्ती मिळून ११४ गावे आहेत. या सर्व गावांत कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन केली असून, या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक, आशा कार्यकर्ती यांना समाविष्ट केले आहे. गावस्तरावर घरोघरी जाऊन तपासणी करणे, आशा कार्यकर्तीला माझे गाव माझी जबाबदारी या अभियानांतर्गत सर्व्हे करण्याचे निर्देश दिले असून, ८० टक्के गावातील सर्व्हे पूर्ण झाले आहेत. कुणी कोरोना लक्षणे असलेला व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती या कोरोना प्रतिबंधक समितीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात पाठविणे व कुटुंबाचे विलगीकरण करणे, आदी कामे आशा कार्यकर्ती करणार आहेत. त्याचबरोबर कोरोना प्रभावित भागात कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे आदेश दिले असून, याची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. आरोग्य विभागावर पडणारा ताण लक्षात घेऊन गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी तालुका गटशिक्षण अधिकारी यांना प्रत्येक गावातील सरकारी शाळांच्या वर्गखोल्या विलगीकरण कक्षासाठी ग्रामसेवकाच्या ताब्यात देण्यास पत्राद्वारे सांगितले असून, याठिकाणी पाणी व विजेची सोय करून देण्याचे आदेशही दिले आहेत.

चाैकट...

या गावांत दैनंदिन व्यवहार बंद

उमरगा तालुक्यातील आलूर, औराद, बलसूर, बेडगा, दाळिंब, येणेगुर, गुंजोटी, एकुरगा, कदेर, काळा निंबाळा, कलदेव निंबाळा, कसगी, मुळज, माडज, केसरजवळगा, कोराळ, नाईचाकूर, सावळसूर, तलमोड, तुंगाव, तुरोरी, येळी या गावांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे ही गावे काेराेना हाॅटस्पाॅट म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. संबंधित गावांतील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.

काेट..

तालुक्यात ग्रामीण भागात सध्याची गंभीर परिस्थिती पाहून उपाययोजना गतिमान करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन करून त्याद्वारे कोरोनाच्या संसर्गास अटकाव घातला जाणार आहे. त्यामुळेच याचे लवकरच चांगले परिणाम दिसतील.

-कुलदीप कांबळे, गटविकास अधिकारी, उमरगा.