शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आप्पासाहेब चव्हाण यांचा सपत्निक सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

उमरग्यात अवैध धंदे सुरूच उमरगा : शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पाेलीस, महसूल विभागाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची ...

उमरग्यात अवैध धंदे सुरूच

उमरगा : शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पाेलीस, महसूल विभागाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे पाेलीस यंत्रणेवर ताण आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांचे फावले आहे. निर्बंध असतानाही अनेक ढाबे बाहेरून बंद दिसत असले, तरी आतून सुरू आहेत. यासाेबतच अन्य व्यवसायांच्या बाबतीतही असेच चित्र आहे. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याचा धाेका बळावला आहे. हा प्रकार लक्षात घेता, अवैध धंदेचालकांविरूद्ध कठाेर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उमरगेकरांतून हाेऊ लागली आहे.

बाजारातील गर्दी कमी हाेता हाेईना

उस्मानाबाद : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाभरातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत गर्दी हाेत आहे. अशा गर्दीमध्ये सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही विसर पडल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत काेराेनाचा धाेका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत ठाेस पावले उचलण्याची गरज आता उस्मानाबादकरांतून व्यक्त केली जात आहे.

साेनारी येथे काेविड सेंटर सुरू

परंडा : तालुक्यातील साेनारी येथे भैरवनाथ काेविड केअर सेंटर गुरूवारी सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन आमदार प्रा.डाॅ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ५१ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा प्रमुख गाैतम लटके, प्रतिष्ठानचे रामचंद्र घाेगरे, नवनाथ जगताप, अंगद फडतरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

आठ महिन्यांनंतर पथदिव्यांची दुरुस्ती

लाेहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते बस स्थानक या दरम्यानच्या रस्त्यावरील पथदिवे मागील सात ते आठ महिन्यांपासून नादुरुस्त हाेते. पथदिवे बंद असल्याने या मार्गावर अंधार असे. परिणामी, या परिसरात अधून-मधून अपघाती घटनाही घडत हाेत्या. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपंचायतीचे सभपती श्रीनिवास फुलसुंदर यांनी तातडीची बैठक घेऊन वायरिंग दुरुस्ती व पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करीत दिवे सुरू केले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर हा रस्ता पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.