शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

... तर एका कारखान्यावर जिल्हा होईल स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

कळंब : तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याकडून युद्धपातळीवर ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी पालकमंत्री शंकरराव गडाख ...

कळंब : तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याकडून युद्धपातळीवर ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पाहणी केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दररोज २० टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू झाल्यास ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे.

चारोखळी येथील धाराशिव कारखान्याचा ऑक्सिजन प्रकल्प हा देशातील पहिलाच ठरला आहे. राज्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातही रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत धाराशिव कारखान्याने पुढाकार घेत, युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम सुरू केले आहे. शुक्रवारी पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कारखान्याच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, औषध निरीक्षक विलास दुसाने उपस्थित होते.

प्रतिदिन २० टन ऑक्सिजन...

धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. यावेळी पालकमंत्र्यांनी पाटील यांच्याकडून प्रकल्पातील घटक व प्रक्रिया जाणून घेतली. या प्रकल्पात दररोज २० टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प सज्ज झाला आहे. जिल्ह्यास दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे.