शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटरग्रीड’च्या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूरचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

कळंब : मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना गुंडाळली हा विरोधकांचा आरोप खोटा व दिशाभूल करणारा आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात ...

कळंब : मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना गुंडाळली हा विरोधकांचा आरोप खोटा व दिशाभूल करणारा आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या योजनेतील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील कामांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असून, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व इतर खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

कळंब न. प.च्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे होत्या. खा. ओमराजे निंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. कैलास पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आ. राहुल मोटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अमित शिंदे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष रामेश्वर निटुरे, प्रतापसिंह पाटील, नितीन बागल, बीड महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, श्रीधर भवर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, मुख्याधिकारी शैला डाके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

बनसोडे यांच्या हस्ते गांधीनगर, सोनार गल्ली ते स्वा. सावरकर चौक रस्ता, बौद्धविहार, शिवाजी महाविद्यालय रस्ता, डॉ. लोंढे घरासमोरील रस्ता तसेच वीर जिवाजी महाले चौक नामफलकाचे अनावरण, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कक्ष, वृक्षारोपण तसेच सांस्कृतिक भवनचे उद्‌घाटन करण्यात आले. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कळंब शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करून तो शासनाकडे सादर करा. यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक लावून आवश्यक निधी मंजूर करू.

प्रारंभी प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी प्रास्ताविक करताना मागील साडेचार वर्षात न.प.न. केलेल्या भरीव विकासकामांचा आढावा सादर केला. यावेळी शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. प्रशांत जोशी, अमर चाऊस, भय्या बावीकर यांचा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात नगराध्यक्षा मुंडे यांनी कळंबकरांच्या विविध मागण्या मान्यवरांकडे मांडल्या. सूत्रसंचालन विशाल वाघमारे, रेजा पायाळ यांनी केले.

चौकट -

पाणीपुरवठ्यासह ईदगाह, शिवसृष्टीसाठी मिळणार निधी

शहरातील अल्पसंख्याक समाजबांधवांसाठी ईदगाह मैदानाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला होता. न.प.न. काही दिवसांपूर्वीच ठराव घेऊन यासाठी जागा उपलब्ध करून दिली. यासाठी दीड कोटी, शिवसृष्टीसाठी अडीच कोटी तर पाणीपुरवठा योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी केली.

चौकट -

टीमचे कौतुक

कळंब शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी केलेल्या नियोजनाचे राज्यमंत्री बनसोडे, खा. निंबाळकर, आ. काळे, आ. पाटील व उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्याचा हात देण्याची भूमिका या मान्यवरांनी व्यक्त केली.

250721\img-20210725-wa0041.jpg

कळंब न प च्या सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा ओमराजे निंबाळकर, आ विक्रम काळे, आ कैलास पाटील, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा आदी उपस्थित होते