शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

९५४ शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शेतकर्‍यांना निश्चित मदत करणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : शेतकर्‍यांना निश्चित मदत करणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या तालुक्यातील ९५४ लाभार्थ्यांना आता उचललेली रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाने नोटीस बजावल्या असून, जवळपास पाऊण कोटींपैकी पाच लाखांची वसुली करण्यात आली आहे.

लहरी निसर्गावर शेती निर्भर असलेले असंख्य शेतकरी अल्प उत्पन्न गटात मोडतात. यामुळे बेभरवशाची बनलेली शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना निश्चित आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यानुसार केंद्र शासनाच्या निकष व अटींमध्ये पात्र असलेल्या शेतकर्‍यांना गतवर्षीपासून प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मदत देण्यात येते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकर्‍यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येते. मागच्या वर्षापासून करण्यात येत असलेल्या या मदतीचे आजवर सहापेक्षा जास्त हप्ते जमा करण्यात आले आहेत.

दरम्यान, निकषात बसत नसतानाही ‘चाललं तर चाललं’ म्हणून योजनेसाठी अपात्र असलेल्या काही व्यक्तिंनी मदत उचलल्याचे समोर आल्यानंतर तालुक्यातील अशा ९५४ लाभार्थ्यांच्या पाठीमागे आता उचललेली रक्कम भरण्यासाठी ससेमिरा लागला आहे. यानुसार तहसील कार्यालयाने अशा व्यक्तिंना नोटीस बजावत रक्कम तहसीलदार यांच्या खात्यावर जमा करण्याची तंबी दिली आहे.

चौकट....

तालुक्यात ३८ हजार लाभार्थी...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमतः अल्प भूधारक शेतकर्‍यांना मदतीचे कवच मिळत होते. यानंतर याची व्याप्ती वाढवण्यात आली. यामुळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली. तालुक्यात जवळपास ६९ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ३८ हजार ६११ शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सध्या लाभ मिळत आहे.

७८९ आयकर दाते रडारवर

शेती नावावर असली तरी प्राप्ती कर भरणा करणार्‍या सधन व्यक्तिंना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले होते. असे असतानाही तालुक्यातील ७८९ आयकर दात्यांनी पीएम किसान योजेनाचा लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालुक्यातील या करदात्यांना पीएम किसान योजनेतून उचललेली रक्कम भरणा करावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

पाऊण कोटीच्या वसुलीसाठी नोटीसा

कुटुंबातील एक सदस्य पात्र असेल तर सामाईक खात्यावरील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय नाही. यासह विविध संविधानिक पदे, पेन्शनर आदींना पीएम किसानचा लाभ देय नाही. यापैकी १६५ अपात्र व्यक्तिंनी अनुदान उचलले आहे. यामुळे प्राप्ती कर भरणा करणारे व इतर कारणांमुळे अपात्र असलेल्या एकूण ९५४ व्यक्तिंना पाऊण कोटी रुपये तहसीलदार यांच्या खात्यावर भरणा करा म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

प्राप्ती कर भरणा करणार्‍या तसेच इतर अपात्र असलेल्या व्यक्तिंनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उचललेली अनुदान रक्कम परत भरणा करावी, यासाठी नोटीस बजावली आहे. संबंधित व्यक्तिंनी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत रक्कम जमा करावी, असे कळवले आहे.

- मंजुषा लटपटे, तहसीलदार कळंब