शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बसवेश्वर चौकात अजित चौधरी यांच्या वतीने मोफत एन-९५ मास्क व हँड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या प्रतिकारशक्तीत वाढ व्हावी, यासाठी कोविड सेंटरमध्ये अंडी वाटप करण्यात आली. कोरोना काळात नगरसेवक चौधरी हे शहरवासीयांच्या मदतीला धावून आले आहेत. रक्तदान शिबिर, किराणा साहित्याचे वाटप, आदी समाजाेपयाेगी काम ते करीत असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी नगरसेवक अजित चौधरी, जगदीश निंबरगे, बसवराज कलशेट्टी, संजय आळंगे, राम पाटील, अरिफ कुरेशी, विशाल मोहिते, नाना टेकाळे, लखन बोंडवे, मोहन जाधव, जयसिंह खंडागळे, उमेश कारडामे, अनिकेत टेकाळे, अतिश चौधरी, राघवेंद्र चौधरी, दत्ता चौधरी, अजित बिराजदार, आदी उपस्थित होते.
सॅनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST