महाविद्यालयात मतदानाची शपथ
लोहारा : शहरातील शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने सोमवारी राष्ट्रीय मतदार दिवस करण्यात आला. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद आचार्य यांनी मतदानाची शपथ दिली. याप्रसंगी डॉ. एस.व्ही. सोनवणे, डॉ. विनायक पाटील, डॉ. बी.एस. राजोळे, प्रा. पी.के. गायकवाड, डॉ. एम.एल. सोमवंशी, डॉ. पी.व्ही. माने, प्रा. डी.व्ही. बंगले, प्रा.डॉ. आर.एम. सूर्यवंशी, प्रा. एस.एन. बिराजदार, प्रा. डी.एन. कोटरंगे शिरीष देशमुख, नंदकिशोर माने, प्रकाश राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते.
‘तुळजाभवानी’त मतदार दिन साजरा
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेखर जगदे हे होते. राष्ट्रीय सेवा योजनाप्रमुख प्रा. श्यामकुमार डोईजोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रबंधिका सुजाता कोळी, ज्येष्ठ प्राध्यापक डी.एस. पवार, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. प्रसाद सुतार व प्रा. सचिन सगरे आदींनी पुढाकार घेतला.
जिल्हा कार्याध्यक्षपदी नारायण साळुंके
तेर : येथील नारायण सोपान साळुंके यांची दलित युवक आंदोलन संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे, प्रदेशाध्यक्ष जोशीला लोमटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मराठवाडा समन्वयक अभिमन्यू लोखंडे, महिला जिल्हाध्यक्षा मीरा जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्षा जोशीला लोमटे यांनीदेखील मार्गदर्शन केले.
वृद्ध महिलेने दिला आंदोलनाचा इशारा
उमरगा : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनीच्या मंजूर वाढीव मावेजाचे चार कोटींपैकी दोन कोटी रुपये परस्पर दुसऱ्याला देऊन शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी भूसंपादन अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी वंदना चव्हाण या वृद्धेने केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.