शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

टेली आयसीयू पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता मृत्युदर, विशेषज्ञांची कमतरता व आयसीयूमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेली आयसीयू सुविधा पुन्हा ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता मृत्युदर, विशेषज्ञांची कमतरता व आयसीयूमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेली आयसीयू सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे गुरुवारी केली आहे.

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णांसाठी क्लाऊड फिजिशियन हेल्थकेअर या कंपनीच्या माध्यमातून व सीएसआरच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात टेली-आयसीयू सुविधा कार्यान्वित केली होती. या माध्यमातून आयसीयूमधील प्रत्येक रुग्णांची २४ तास निगराणी केली जात होती. तज्ज्ञ डॉक्टर्सकडून उपचाराची कार्यप्रणाली ठरवून त्याप्रमाणे उपचार केले जात होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तज्ज्ञांना देशातून कोठूनही रुग्णांची देखरेख व इलाज करणे शक्य होते. या सुविधेचा मोठा फायदा झाला होता व सीएसआर निधीमुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडला नव्हता.

आजची परिस्थिती पाहता आयसीयूमधील रुग्णांची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन सुविधेचे बेड आणि व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्यामुळे रुग्णांचे आयसीयूमध्ये उपचार करीत असताना निगराणी राखण्यात व वेळेवर औषधोपचार करण्यात मर्यादा येत आहेत.

सरकारी रुग्णालयातील ४०० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्णांच्या उपचारासाठी केवळ दोन फिजिशियन, व दोन भूलतज्ज्ञ आहेत. त्यामुळे टेली मेडिसिनचा वापर अनिवार्य वाटतो. ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने टेली आयसीयू कार्यप्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे.