लोहारा : तालुक्यातील वडगाववाडी येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
१४ ऑक्टोबर २०२० रोजीच्या मुसळधार पावसामुळे या तलावाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तसेच तलावाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर जलसंधारण विभागाकडून याचे नियोजन करण्यात आले. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, प्रभारी तहसीलदार रोहन काळे, गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, सरपंच वनमाला गिराम, पं.स. सभापती हेमलता रणखांब, जि.प. सदस्या शोभा तोरकडे, माजी जि.प. सदस्य गुंडू भुजबळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.