सध्या बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्डद्वारे रेशन धान्याची उचल करणाऱ्या शिधापत्रिकांसाठी ही मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकेची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी त्या त्या विभागातील शासकीय कर्मचारी व किंवा तलाठ्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फार्म वाटप करण्यात येतील. संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धाकरकांकडून माहिती भरुन दिलेले फॉर्म स्वीकृत करुन अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात येणार आहे. अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरुन घेऊन व जुने कागदपत्रे जोडून सर्व अर्ज यादीसह संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करण्यात येईल व ही प्रक्रिया महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. अर्ज व कागदपत्रांची तपासणी पुरवठा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी करणार आहेत. शोधमोहिमेत विशेषत: शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शाेधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेता येणार आहे. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळले जाणार आहे. एकाच कुटुंबात विभक्त सदस्यांना अंत्योदय किंवा बीपीएल लाभ मिळणार नाही. याची खबरदारी घेतली जाणार आहे.
चौकटी...
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
शिधापत्रिकांच्या तपासणीचा आढावा घेऊन तपासणीची कार्यपध्दती व इतर बाबींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असणार आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हापुरवठा अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
हे पुरावे आवश्यक......
भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड आदी पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
...तर रेशनकार्ड होईल रद्द
ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खासगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांचे वार्षिक उत्त्पन्न १ लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरून रद्द होणार आहेत.
या कारणाने रेशनकार्ड रद्द होईल
स्थलांतरित शिधापत्रिकाधारक, दुबार शिधापत्रिकाधारकांची एका ठिकाणीची शिधापत्रिका रद्द होणार आहे. तसेच, मयत शिधापत्रिकाधारकांचे नावे वगळण्यात येणार आहेत. १ लाखापेक्षा अधिक उत्त्पन्न असलेल्या कुटुंबाची शिधापत्रिका रद्द होणार आहे.
कोट...
१ फेब्रुवारीपासून अपात्र रेशनकार्डधारकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जे शिधापत्रिकाधारक पुरावे सादर करणार नाहीत. त्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत मिळेल, आवश्यकतेनुसार मुदतवाढ मिळेल. या कालावधीत पुरावे सादर केल्यास शिधापत्रिका सुरु राहिल, पुरावे न मिळाल्यास ती रद्द करण्यात येईल.
डॉ. चारुशीला देशमुख,
जिल्हा पुरवठा अधिकारी,
३२४०००
जिल्ह्यातील एकूण कार्डधारक
३८९७३
अंत्याेदय
५१, ५४१
एपीएल
केशरी
५१३९६