रशीद जमादार
अचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील रशीद इमामसाब जमादार यांचे बुधवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. येथील कब्रस्तानामध्ये त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जिजाबाई चौरे यांचे निधन
मस्सा (खं.) : कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील रहिवासी जिजाबाई जंगलू चौरे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
माणिक बिराजदार
मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन माणिक बिराजदार (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केसरजवळगा येथील त्यांच्या शेतात गुरुवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, पाच भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुरूम बाजार समितीच्या संचालक श्रीदेवी बिराजदार यांचे ते पती होत.