शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात दुर्गम लिंगाणा सर करून फडकवला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

कळंब : जागेवरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भूभागावरील निसरडी वाट असलेल्या दुर्गम अशा लिंगाण्याच्या ‘वाटेला’ किमान पावसाळ्यात ...

कळंब : जागेवरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भूभागावरील निसरडी वाट असलेल्या दुर्गम अशा लिंगाण्याच्या ‘वाटेला’ किमान पावसाळ्यात तरी कोण जात नाही. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार’ परिवाराच्या आठ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर केलाच, शिवाय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ७५ फूट रूंदीचा तिरंगा फडकावला आहे. यात कळंब येथील शुभम राखुंडे या ‘ट्रेकर’ नेही सहभाग नोंदवला.

रायगडचा उपदुर्ग असलेला लिंगाणा हा अतिशय दुर्गम व तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचीचा हा सुळका कठीण खडकाळ असाच. महाडपासून काही अंतरावर असलेल्या अरूंद वाटाच्या अन् विविध घाटांच्या या दुर्गम भागातील लिंगाणा हा दुर्ग सर करणे, ते ही पावसाच्या धारा कोसळत असताना महत्कठीणच. अशा या खडतर मोहिमेची आखणी शिलेदार गिर्यारोहक संस्थेने केली. स्वातंत्र्यदिनी लिंगाणा सर करायचा अन् तेथे तिरंगा फडकवायचा, असा दृढनिश्चय केला. शिलेदारचे संस्थापक सागर नलावडे, प्रवीण परब, अनिकेत जाधव, सागर मोहिते, शैलेश जाधव, मोनिष येनपुरे, कविता जाधव, शीतल जाधव, अमिता सालीयन, विनायक पुरी, प्रशांत सूर्यवंशी या विविध भागातील गिर्यारोहकांसह कळंब येथील शुभम राखुंडे हा तरूणही यात सहभागी झाला होता.

सागर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली या टीमने १४ ऑगस्ट रोजी लिंगाण्यालगतच्या मोहरी गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लिंगाण्याची वाट धरली. यासाठी कठीण अशा बोराट्याची नाळ या अरूंद, घसरण असलेल्या घाटातून मार्गस्थ होत, एकमेकांचा आधार बनत सुळका सर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुर्गम लिंगाणा सर करत त्याठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ७५ फूट रूंदीचा तिरंगा दिमाखात फडकवला.

चौकट...

पावसाळ्यात धाडस, मोहीमही फत्ते

उंचच्या उंच सुळका, त्याची खडकाळ अन् निसरडी वाट, नाळेत खळाळणारे पाणी, जागोजागची घसरण, धुक्याचे सावट अन् बरसणाऱ्या धारा यामुळे पावसाळ्यात लिंगाणा सर करणे कठीणच असते, असे सांगत शुभम राखुंडे यांनी आम्ही सर्वांनी एकमेकांना आधार देत, काळजी घेत ही मोहीम पावसाळ्यातच फत्ते केली असे सांगितले. यास पायथ्यावरून रजनीकांत जाधव यांनी योग्य बॅकअप दिले.