अणदूर : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तीन लाख रुपये खर्च करून तसेच जि. प. शाळेसाठी एक लाख रुपये खर्च करून आरओ सयंत्र बसवले आहे. यामुळे ग्रामस्थांना आता पाच रुपयांत १५ लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ही सोय मोफत राहणार आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शरद नरवडे, ग्रामविकास अधिकारी महेश मोकाशे, नागनाथ बोंगरगे, ग्रामपंचायत सदस्य राम जवळगे, शेकाप्पा सालगे, सावंत पवार, महादेव चिंचोले, संगमेश्वर चिंचोले, अमोल नरवडे, अर्जुन काटे, नागनाथ स्वामी, सुधाकर घोडके,अनंत अहंकारी, नागनाथ जत्ते, भास्कर व्हलदुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
खुदावाडी येथे पाच रुपयांत शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST