शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे, दीड टक्के रुग्णांनाच मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून जवळपास दीड महिन्यात केवळ ३५७ रुग्णांवरच मोफत उपचार झाले आहेत. दुसरीकडे याच ...

उस्मानाबाद : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून जवळपास दीड महिन्यात केवळ ३५७ रुग्णांवरच मोफत उपचार झाले आहेत. दुसरीकडे याच कालावधीत तब्बल २६ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले. रुग्णांच्या तुलनेत दीड टक्क्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

ज्या कुटूंबाकडे रेशन व आधारकार्ड आहे, अशा सर्वांनाच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत कोविड उपचार मिळण्याची सोय आहे. असे असले तरी त्याचा लाभ मात्र पुरेसा मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात १ एप्रिल ते १२ मे या कालावधीत कोरोना रुग्णांची वेगाने वाढ झाली. तब्बल २६ हजारांवर रुग्ण या कालावधीत आढळून आले. मात्र, योजनेतून उपचार मिळाले केवळ ३५७ रुग्णांना. त्यातही शासकीय रुग्णालयेच या योजनेतून उपचार देण्यात आघाडीवर आहेत. जिल्ह्यात सध्या १३ रुग्णालयांत ही योजना अंगीकृत आहे. यातील सहा रुग्णालये खाजगी आहेत. उपराेक्त कालावधीत या खाजगी रुग्णालयांनी केवळ ८२ रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. तर उर्वरित ७ शासकीय रुग्णालयांनी २७५ रुग्णांना लाभ दिला आहे. या योजनेतून मंजूर होणारी रक्कम पुरेशी नसल्याने खाजगी रुग्णालयांतून ही योजना राबविण्याबाबत अनुत्सुकता दिसत आहे.

पॅकेज ठरतेय तुटपुंजे...

या योजनेअंतर्गत एका कुटूंबाला दीड लाखांपर्यंतची मदत शासन देते. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन त्यानुसार याेजनेचे पॅकेज ठरत असते. अगदी २० हजारांपासून याची सुरुवात होते. मात्र, गंभीर असलेल्या रुग्णाचे बिल हे दीड लाखांच्या वर जाण्याचीही शक्यता असते. ही वरची रक्कम रुग्ण किंवा नातेवाईक देणार नाहीत, या शंकेने खाजगी रुग्णालये शक्यतो असे रुग्ण टाळण्याच्या बेतात असतात.

अशी करा नोंदणी...

या योजनेशी संलग्न असलेल्या प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्राची नेमणूक केलेली असते. रुग्णालयात गेल्यानंतर लागलीच आरोग्य मित्राकडे रेशन व आधार कार्ड जमा केल्यास तो नोंदणी करुन घेतो. दरम्यान, रुग्णालयात जाताना सोबत कागदपत्रे नसली तरी उपचार सुरु करुन नंतरही कागदपत्रे आरोग्यमित्राकडे जमा करता येऊ शकतात.

तर करा तक्रार...

याेजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयाने या योजनेतून उपचार करण्यास असमर्थतता दर्शविल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना याबाबत तक्रार करता येते. संबंधित रुग्णालयातील आरोग्यमित्राकडे ही तक्रार देता येईल. तेथे शक्य नाही झाल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक किंबहुणा जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही तक्रार देता येऊ शकते.

पैसे भरण्याची तयारी असल्यासच ॲडमिशन...

१. या योजनेतून उपचार सुरु करण्यापूर्वी किंवा ॲडमिशन करुन घेण्यापूर्वीच रुग्णालयांकडून बिलाबाबत सांगण्यात येत आहे. रुग्ण गंभीर असल्यास उपचारावर जर जास्तीचा खर्च झाला तर वरची रक्कम द्यावी लागेल. ती देण्याची तयारी असल्यासच ॲडमिट करुन घेण्यात येत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

२. रुग्णसंख्या एकाएकी वाढल्याने खाजगी रुग्णालयांत बेड मिळणे कठीण झाले होते. त्यातही योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत तर तोबा गर्दी. त्यातही योजनेतून उपचार घ्यायचे असे सांगितल्या बेड फुल्ल असल्याचा निरोप कानी पडत असल्याने शासकीय रुग्णालय गाठावे लागल्याचे एका नातेवाईकाने सांगितले.

३. रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांमध्ये योजना व बिलावरुन निर्माण होत असलेल्या वादामुळे काही खाजगी रुग्णालयांनी या योजनेतून आता अंग काढून घेतले आहे. त्यामुळे याेजनेतील खाजगी रुग्णालयांची संख्या कमी झाली आहे.

अशी आहे आकडेवारी...

योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये : १३

एकूण कोरोनाबाधित : २६०००

कोरोनामुक्त : २०९६७

मृत्यू : ४७४

योजनेचे लाभार्थी : ३५७